बकरी ईद-लेख-3

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 04:18:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "बकरी ईद"
                                     ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२९.०६.२०२३-गुरुवार आहे. आज "बकरी ईद" आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर 70 दिवसांनी बकरी ईदचा सण साजरा करण्यात येतो. या सणाला ईद-अल-अजहा किंवा ईद-उल-जुहा असंही म्हटलं जातं. आजच्या दिवशी नमाज पठण केल्यानंतर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. या दिवशी गरीब लोकांना जेवण दिलं जातं. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बकरी ईदच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही माहितीपूर्ण लेख.

     हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला बकरी ईद माहिती, इतिहास मराठी | Bakra Eid Information in Marathi मराठीत देणार आहे तर चला बघुयात.

                     बकरी ईद--

     बकरी ईद हा मुस्लिम बांधवांचा एक महत्त्वाचा सण आहे. पशुबली देणे. हा या सणाचा मुख्य विधी असतो. पैगंबरवासी हजरत इब्राहिम यांना एकदा एक स्वप्न पडले. स्वप्नात अल्लाह त्यांना म्हणाला- तुझी सर्वांत आवडती जी वस्तू असेल ती माझ्यासाठी कुर्बान कर. त्यानुसार इब्राहिम यांनी सकाळी शंभर उंट कुर्बान केले. पुन्हा दोन दिवस इब्राहिमला तेच स्वप्न पडले. इब्राहिमनी पुन्हा शंभर उंट कुर्बान केले. तिसऱ्या रात्री तेच स्वप्न पडले असता इब्राहिम यांनी विचार केला, माझी सर्वात प्रिय वस्तू म्हणजे माझा मुलगा.

     मग इब्राहिम आपल्या मुलाला घेऊन मैदानावर गेले व त्याची कुर्बानी करू लागले. पण सुरी चालेना. त्याच वेळी खुदाकडून फर्मान आले : तू परीक्षेत उतीर्ण झाला आहेस. तुझ्या मुलाऐवजी बकऱ्याची कुर्बानी कर. त्या दिवसापासून बकरी ईद सण सुरू झाला असे म्हणतात. मक्केजवळ मिना येथे सर्व अरब यात्रेकरू हा बलिविधी साजरा करीत असत. तीच प्रथा इस्लामने उचलली. प्रत्येक मुसलमानाने हा विधी धार्मिक दृष्ट्या साजरा करणे कर्तव्य मानले आहे.

     या दिवशी मुख्यतः बकऱ्याची कुर्बानी करतात. ज्यांना पशू विकत घेण्याची ऐपत असेल त्याने दरडोई एक मेंढी किंवा वैध ठरलेला पश किंवा सात व्यक्तीं मागे एक उंट बळी द्यावयाचा असतो. बळी द्यावयाचा पशू ठराविक वयाचा व अव्यंग, निरोगी असावा लागतो. बळी देण्यात येणाऱ्या पशूच्या मांसाचे तीन भाग करतात. त्यांतील एक गरिबांना, दुसरा नातलगांना व तिसरा स्वतःसाठी वापरतात. आपल्याजवळ जी संपत्ती असेल तिचा फक्त आपणच उपभोग घ्यावयाचा नाही, तर ती इतरांनाही वाटावी, ही यामागची भूमिका आहे.

     जो एकटाच खातो तो विष खातो व सर्वांना देऊन खातो तो अमृत खातो, असा उदात्त विचार यात असावा. या दिवशी सर्व मुसलमान लोक प्रातःकाळी स्वच्छ स्नान करून, नवीन वस्त्रे परिधान करून उघड्यावर ईदगाहच्या ठिकाणी सूर्योदयानंतर पण सूर्य मध्यावर येण्यापूर्वी एकत्र जमतात. नंतर सामूहिक प्रार्थना म्हणजे नमाज होते. प्रार्थनेनंतर खुल्बा म्हणजे धार्मिक प्रवचन होते. धार्मिक दृष्ट्या खुल्बा ऐकणे आवश्यक असते.

     खुल्बा पढल्यानंतर 'ईद मुबारक' असे म्हणून एकमेकांना भेटून आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या जातात. त्यानंतर सर्व लोक आपआपल्या घरी जाऊन बलिविधी करतात. भेटावयास आलेल्या लोकांना फराळाचे पदार्थ, पानसुपारी व अत्तरगुलाब देतात. बकरी ईद हा सण आनंददायक तर आहेच; पण त्याचबरोबर कौटुंबिक व सामाजिक ऐक्य व प्रेम वृद्धिंगत करणारा आहे.

--by Shub
------------
                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी गुरु.इन)
                        ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================