३०-जून-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, June 30, 2023, 04:05:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०६.२०२३-शुक्रवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "३०-जून-दिनविशेष"
                                 -------------------

-: दिनविशेष :-
३० जून
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९७
ब्रिटनने चीनकडुन ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेटांच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.
१९८६
केन्द्र सरकार व मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.
१९७८
अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.
१९७१
सोयुझ-११ या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.
१९६६
कोका सुब्बा राव यांनी भारताचे ९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६५
भारत व पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.
१९६०
काँगोला (बेल्जियमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९४४
मुंबईच्या 'सेंट्रल' सिनेमात 'प्रभात'चा 'रामशास्त्री' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटापासून ललिता पवार या अभिनेत्रीवर खलनायिकेचा कायमचा शिक्‍का बसला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९६९
सनत जयसूर्या – श्रीलंकेचा क्रिकेटपटू
१९६६
माईक टायसन – अमेरिकन मुष्टीयोद्धा
१९४३
सईद अख्तर मिर्झा – दिग्दर्शक आणि पटकथालेखक
१९२८
कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्‍या 'कल्याणजी-आनंदजी' या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू
(मृत्यू: २४ ऑगस्ट २०००)
१४७०
चार्ल्स (आठवा) – फ्रान्सचा राजा
(मृत्यू: ७ एप्रिल १४९८)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९९९
कृष्णा बळवंत तथा कृ. ब. निकुंब – सहजसुंदर काव्याविष्काराचा प्रत्यय घडवणारे मराठी काव्यसृष्टीतील कवी
(जन्म: ? ? ????)
१९९७
राजाभाऊ साठे – शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक, यांनी २५ वर्षे कै. राम मराठे यांच्याबरोबर संगीत सौभद्र नाटकात श्रीकृष्णाची भूमिका केली होती.
१९९४
बाळ कोल्हटकर
बाळकृष्ण हरी तथा 'बाळ' कोल्हटकर – नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, लेखक व दिग्दर्शक
(जन्म: २५ सप्टेंबर १९२६)
१९९२
डॉ. वसंत कृष्ण वराडपांडे – साहित्यिक, वक्ते व समीक्षक
(जन्म: ? ? ????)
१९१७
दादाभाई नौरोजी
२०१७ मध्ये जरी केलेले टपाल तिकीट
पितामह दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय
(जन्म: ४ सप्टेंबर १८२५)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.06.2023-शुक्रवार.
=========================================