०१-जुलै-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, July 02, 2023, 11:20:19 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

काल दिनांक-०१.०७.२०२३-शनिवार होता.जाणून घेऊया,कालच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                 "०१-जुलै-दिनविशेष"
                                -------------------

-: दिनविशेष :-
०१ जुलै
राष्ट्रीय डॉक्टर दिन
महाराष्ट्र कृषी दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००१
फेरारी संघाच्या मायकेल शूमाकरने जागतिक फॉर्मुला वन मालिकेतील फ्रेन्च ग्रां. प्री. शर्यत जिंकून फॉर्मुला वन मालिकेतील ५० वे विजेतेपद पटकावले.
१९९७
शतकातील सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताच्या कुंजरानी देवीचा समावेश करण्यात आला.
१९९१
सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांत अस्तित्त्वात असलेला 'वॉर्सा करार' संपुष्टात आला. परस्पर संरक्षणाचा हा करार 'नाटो करारा'ला प्रतिशह देण्यासाठी १४ मे १९५५ रोजी करण्यात आला होता.
१९६४
न. वि. गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.
१९६२
सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.
१९६१
महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुणे विद्यापीठाचे चौथे कुलगुरू झाले.
१९६०
रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.
१९५५
'स्टेट बँक ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९५५' अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्त्वात आली. याआधी ही बँक इंपिरिअल बँक या नावाने ओळखली जात होती.
१९४९
त्रावणकोर व कोचीन ही दोन संस्थाने एकत्र करुन 'थिरुकोची' संस्थान निर्माण करण्यात आले. याचेच पुढे केरळ राज्य बनले.
१९४८
बाजारपेठेतील व्यापार्‍यांचे नेतृत्त्व करणार्‍या 'पूना मर्चंट्स चेंबर' या संस्थेची स्थापना
१९४८
'कायदेआझम' मुहम्मद अली जीना यांच्या हस्ते 'स्टेट बँक ऑफ पाकिस्तान' या पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे उद्‍घाटन झाले.
१९४७
फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.
१९३४
मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश
१९३३
नाट्यमन्वंतर संस्थेच्या 'आंधळ्यांची शाळा' या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९१९
कै. बाबूराव ठाकूर यांच्या 'तरुण भारत' (बेळगाव) या वृत्तपत्राची सुरूवात झाली.
१९०९
क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची इंपिरिअल इन्स्टिट्युटच्या 'जहांगिर हाऊस'मधे इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी गोळ्या झाडून हत्या केली.
१८८१
कॅनडातुन अमेरिकेत जगातील पहिला आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल करण्यात आला.
१८३७
जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली.
१६९३
संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९६६
उस्ताद राशिद खान – रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक
१९६१
कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर
(मृत्यू: १ फेब्रुवारी २००३)
१९४९
वेंकय्या नायडू – भारताचे १३ वे उपराष्ट्रपती, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष
१९३८
पंडित हरिप्रसाद चौरसिया – बासरीवादक, पद्मविभूषण
१९१३
वसंतराव नाईक – महाराष्ट्राचे चौथे (आणि आतापर्यंत सर्वाधिक कार्यकाळ असलेले) मुख्यमंत्री (५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५), ६ व्या लोकसभेतील खासदार (वाशीम मतदारसंघ), मध्यप्रदेशमधील विधानपरिषदेचे सदस्य (१९५२ - १९५७)
(मृत्यू: १८ ऑगस्ट १९७९)
१८८२
डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्‍न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य
(मृत्यू: १ जुलै १९६२ - कलकत्ता, पश्चिम बंगाल)
१८८७
कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर
(मृत्यू: ? ? १९२०)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९९४
राजाभाऊ नातू – दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक व नाट्य संघटक
(जन्म: ? ? ????)
१९८९
प्राचार्य ग. ह. पाटील – कवी व शिक्षणतज्ञ, 'माझ्या मामाची रंगीत गाडी हो', 'देवा तुझे किती, सुंदर आकाश', 'डराव डराव, डराव डराव, का ओरडता उगाच राव' अशी त्यांची अनेक बालगीते लोकप्रिय आहेत.
(जन्म: ? ? ????)
१९६९
मुरलीधरबुवा निजामपूरकर – कीर्तनकार
(जन्म: ? ? ????)
१९६२
डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्‍न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य
(जन्म: १ जुलै १८८२ - पाटणा, बिहार)
१९६२
पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्‍न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष
(जन्म: १ ऑगस्ट १८८२)
१९४१
सर सी. वाय. चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री
(जन्म: १० एप्रिल १८८० - विजयनगरम, आंध्र प्रदेश)
१९३८
गणेश श्रीकृष्ण तथा 'दादासाहेब' खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, 'वर्‍हाडचे नबाब'
(जन्म: २७ ऑगस्ट १८५४)
१८६०
चार्ल्स गुडईयर – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक
(जन्म: २९ डिसेंबर १८००)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.07.2023-शनिवार.
=========================================