दिन-विशेष-लेख-महाराष्ट्र कृषी दिन-A

Started by Atul Kaviraje, July 02, 2023, 11:25:12 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                 "दिन-विशेष-लेख"
                                "महाराष्ट्र कृषी दिन"
                               ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     काल दिनांक-01.07.2023-शनिवार होता.  १ जुलै-हा दिवस "महाराष्ट्र कृषी दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     वसंतराव नाईक यांची जयंती "कृषी दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन 1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला. तेव्हापासून 1 जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषीदिन साजरा होत आहे. देशाची तसेच राज्याची अर्थव्यवस्था मुख्यत: कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे.

=========================================
महाराष्ट्र कृषी दिनाविषयी माहीती
1)महाराष्ट्र कृषी दिन कधी साजरा केला जातो?
2) महाराष्ट्र कृषी दिन का साजरा केला जातो?यामागचा इतिहास काय आहे?
3)वसंतराव नाईक कोण होते?
वसंतराव नाईक यांचा जन्म कधी अणि कोठे झाला?
वसंतराव नाईक यांचे शिक्षण –
वसंतराव नाईक यांचा मृत्यु कधी आणि कोठे झाला?
महाराष्ट्र कृषी दिनाचे महत्व काय आहे?
=========================================

              महाराष्ट्र कृषी दिनाविषयी माहीती--

     महाराष्टातील एक प्रमुख व्यवसाय आहे.येथील अधिकतर लोक शेती हाच व्यवसाय करतात.महाराष्टच नव्हे तर आपल्या पुर्ण देशाचीच अर्थव्यवस्था आज शेतीवर अवलंबुन आहे.

     आज आपला शेतकरी शेतात दिवसभर राबतो तेव्हा आपल्याला अन्न प्राप्त होत असते.म्हणुन आपला भारत देश हा एक कृषीप्रधान म्हणजेच शेतकरींचा देश म्हणुन ओळखला जातो.

     आजच्या लेखात आपण आपल्या महाराष्ट्रातील शेतकरयांसाठी दरवर्षी साजरा केला जात असलेल्या असलेल्या एक अत्यंत महत्वाच्या दिनाविषयी माहीती जाणुन घेणार आहे ज्याचे नाव आहे महाराष्ट कृषी दिवस.

     चला तर मग जाणुन घेऊया ह्या दिवसाविषयी अधिक सविस्तरपणे.

1)महाराष्ट्र कृषी दिन कधी साजरा केला जातो?
1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जात असतो.1 जुलै ते 7 जुलै हा कालावधी कृषी सप्ताह म्हणुन दरवर्षी साजरा केला जात असतो.

2) महाराष्ट्र कृषी दिन का साजरा केला जातो?यामागचा इतिहास काय आहे?
महाराष्ट्र कृषी दिन हा दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्टातील हरित क्रांतीचे जनक म्हणुन ओळखले जात असलेल्या महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी शेतकरयांसाठी दिलेल्या त्यांच्या अमुल्य योगदानाच्या आठवणीत दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जातो.

     वसंतराव नाईक यांनी शेतकरयांच्या शेतीविषयक समस्या हाताळल्या होत्या.ज्यात त्यांनी आपले मुख्य लक्ष महाराष्टामधल्या धान्याच्या समस्या सोडविण्याकडे दिले होते.महाराष्ट धान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण व्हावा यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले होते.वेळप्रसंगी त्यांनी महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण न झाल्यास मी फाशी घेईल असे देखील स्पष्टपणे ठामपणे सांगितले होते.यावरून आपणास कळुन येते की त्यांच्या मनात शेती आणि शेतकरी या दोघांविषयी किती कळकळ होती.हे दोघेही त्यांच्या किती जिव्हाळयाचे होते.

     आणि ही क्रांती घडवून आणत असताना फार मुबलक साधने तेव्हा उपलब्ध होती.परिस्थिती देखील खुप प्रतिकुल होती.तरी देखील वसंतराव नाईक यांनी ही शेती क्षेत्रामधील क्रांती घडवून आणली होती.

3)वसंतराव नाईक कोण होते?
वसंतराव नाईक हे महाराष्ट राज्याचे तिसरे मुख्यमंत्री होते ते महाराष्टातील हरित क्रांतीचे जनक म्हणुन देखील प्रसिदध आहेत.याचसोबत ते एक कुशल शेतीतज्ञ आणि हाडाचे शेतकरी देखील होते.म्हणुनच वसंतराव नाईक यांच्या मनात शेती शेतकरी बांधव यांच्याविषयी खुप कळकळ होती.

वसंतराव नाईक यांचा जन्म कधी अणि कोठे झाला?
वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै रोजी 1993 मध्ये यवतमाळ जिल्हयामधील पुसद नावाच्या एका छोटयाशा खेडेगावात एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला.

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-वेब शोध इन मराठी.कॉम)
                   ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.07.2023-शनिवार.
=========================================