दिन-विशेष-लेख-महाराष्ट्र कृषी दिन-B

Started by Atul Kaviraje, July 02, 2023, 11:27:27 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                  "महाराष्ट्र कृषी दिन"
                                 ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     काल दिनांक-01.07.2023-शनिवार होता. १ जुलै-हा दिवस "महाराष्ट्र कृषी दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

वसंतराव नाईक यांचे शिक्षण –
● वसंतराव नाईक यांचे सुरुवातीचे शिक्षण वेगवेगळया खेडेगावांत झाले.विठोली आणि अमरावती शहरात त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पुर्ण केले.

● नागपुरमधील एका काँलेजातुन बीए ची डिग्री प्राप्त केली.याचसोबत त्यांनी एल एलबी देखील केले होते.काही काळ वकिली केल्यानंतर ते पुसद येथील कृषी मंडळाचे अध्यक्ष बनले.यानंतर कृषीमंत्री महसुलमंत्री मुख्यमंत्री अशी अनेक पदे त्यांना प्राप्त झाली.

वसंतराव नाईक यांचा मृत्यु कधी आणि कोठे झाला?
वसंतराव नाईक यांचा मृत्यु सिंगापुर येथे असताना झाला होता.

वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात दिलेले अमुल्य योगदान-
शेतीला आधूनिक स्वरुप प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी एकेकाळी खुप प्रयत्न केले.शेतकरींसाठी त्यांनी राज्यात कृषी विद्यापीठ स्थापित केले.

     शेतकरी बांधवांना संकरीत बियाणे उपलब्ध करून दिली.जो अन्नधान्याचा दुष्काळ निर्माण झाला होता त्यांनी त्यावर देखील मात करून दाखवली.

     1972 मध्ये दुष्काळाची समस्या निर्माण झाली तेव्हा देखील त्या समस्येला सोडवित त्यांनी शेतकरींना दुष्काळ निवारण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले.

     एवढेच नव्हे तर वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्र राज्यामधल्या कृषी विकासाच्या पायाला रोहयो प्रकल्पांतर्गत योग्य दिशा देत मजबुती प्राप्त करून दिली.

     म्हणुनच वसंतराव नाईक यांनी शेतकरयांसाठी केलेल्या ह्या कौतुकास्पद आणि अमुल्य कार्याच्या स्मरणात दरवर्षी त्यांचा वाढदिवस हा महाराष्ट्र कृषी दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.

                महाराष्ट्र कृषी दिनाचे महत्व काय आहे?--

● हा दिवस शेतकरयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारया वसंतराव नाईक यांच्या आठवणीत त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साजरा केला जातो.

● हा दिवस महाराष्टातील सर्व शेतकरी बांधवांच्या शेतीविषयक अडचणी समस्या व्यासपीठावर मांडण्याचा एक उत्तम दिवस आहे.

● या दिवशी शेतकरींच्या समस्यांवर चर्चा केली जाते.शेतकरी बांधवांच्या सर्व शेतीविषयक समस्यांवर मुख्यत प्रकाश टाकला जातो.आणि त्या सोडविण्यासाठी विविध योजना मोहीम शासनाकडुन तयार केल्या जातात.

● शेतकरयांसमोर असलेल्या अडचणींवर विचार केला जातो त्या सोडविण्यासाठी उपाययोजना केली जाते.थोडक्यात हा दिवस महाराष्टातील सर्व शेतकरींना समर्पित दिवस असतो.ज्यात शेती आणि शेतकरी या दोन बाबींचाच विचार केला जातो.

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-वेब शोध इन मराठी.कॉम)
                 ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.07.2023-शनिवार.
=========================================