II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 05:49:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II गुरुपौर्णिमा II
                                 ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     'गुरुने दिला ज्ञानरुपी वसा... आम्ही चालवू हा पुढे वारसा' गुरुचे अस्तित्व प्रत्येकाच्या आयुष्यात दिशादर्शकाचे काम करते. आई ही सगळ्यांचीच सर्वप्रथम गुरु. तिच्याकडूनच लहानपणी अनेक गोष्टींचे बाळकडू पाजले जाते. समाजात वावरण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचे ज्ञान ही आईरुपी गुरु आपल्याला देते. त्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शक रुपाने आपल्याला वेगवेगळ्या गुरुंचे मार्गदर्शन लाभते. अशा या गुरुंना वंदण्यासाठी त्यांनी दिलेल्या ज्ञानाचे ऋण व्यक्त करण्यासाठी 'गुरुपौर्णिमा' साजरी केली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. भारतात फार पुरातन काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे म्हणतात. गुरुपौर्णिमेची संपूर्ण माहिती शाळेत अनेकांना दिली जाते. या खास दिवशी तुमच्या गुरुंना तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (happy guru purnima quotes in marathi), गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश (guru purnima message in marathi), गुरूपौर्णिमा स्टेटस (guru purnima status in marathi), गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा (guru purnima wishes in marathi) पाठवून तुम्ही तुमच्या गुरुंना तुमचे त्यांच्या जीवनातील स्थान दाखवून देण्यासाठी आम्ही काही खास शुभेच्छा संदेश निवडले आहेत. जे तुम्ही तुमच्या आयुष्यातील सगळ्या गुरुंना पाठवू शकता.

     काही विचार हे आपल्याला प्रेरित करतात. गुरुपौर्णिमेच्या या दिवशी तुम्ही गुरुपौर्णिमा कोट्स मराठी (Guru Purnima Marathi Quotes) पाठवा आणि आपल्या गुरुंचे ऋण शब्दातून व्यक्त करा.

                गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
जो बनवतो प्रत्येकाला मानव,
जो करतो खऱ्या-खोट्याची ओळख,
देशाच्या अशा निर्मात्यांना आमचा कोटी-कोटी प्रणाम!

ज्याच्या मनात गुरुंविषयी सन्मान असतो,
त्यांच्या पायाशी सारे जग असते, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

जेव्हा सगळे रस्ते बंद पडतात, तेव्हा नवा रस्ता दाखवतो गुरु,
पुस्तकांमधील ज्ञान नाही तर आयुष्याचा पाठ पढवतात गुरु,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

तोच गुरु श्रेष्ठ ज्याच्या प्रेरणेने,
एखाद्याचे चरित्र बदलते,
मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीत
रंगत बदलते, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्ञान, संस्कार, मार्गदर्शन यांसारख्या गोष्टीतून
ज्यांनी केला आपल्या शिष्यावर खोलवर परिणाम
ज्यांनी आपल्याकडील विद्या नि:स्वार्थ अपर्ण केली
अशा गुरुंना माझ्या कोटी कोटी प्रणाम!

गुरु आहे सावली, गुरु आहे आधार
गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार,
गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात,
शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरु दाखवतात यशाचा मार्ग,या मार्गावर चालून मिळवा
यश संपन्न आयुष्य, अशा माझ्या गुरुंना
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट,
घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञान,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
– ग.दि. माडगुळकर

होते गुरु म्हणून आयुष्याला आले कळून
चांगले होण्यासाठी सोबत हवा नेहमीच एक गुरु
गुरुचा भेदभाव करु नका,
गुरुपासून दूर राहू नका,
गुरुविना माणूस हा डोळ्यातून वाहणारपाणी आहे,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

सर्वोत्कृष्ट गुरु हा पुस्तकातून नव्हे तर मनापासून शिकवतात,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

एखादा गुरु हा मेणबत्तीसारखा असतो, जो इतरांचा मार्ग प्रकाशण्यासाठी स्वत: जळत राहतो
गुरुचा उद्देश्य स्वत:च्या  प्रतिमेमध्ये शिष्य निर्माण करु शिकणाऱ्या शिष्याचा विकार करणे
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा,
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती,
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतिक
आपणा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!
=========================================

--लीनल गावडे
-------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                      ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================