II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 05:51:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II गुरुपौर्णिमा II
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     आपल्या गुरुंवरील जसे गौतम बुद्ध यांना अनेक जण गुरूस्थानी मानतात आणि बुद्धपौर्णिमेसाठी शुभेच्छा पाठवून गुरूंवरील प्रेम व्यक्त करतात. तसंच टीचर्स डे ला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतात. आम्ही गुरूस्थानी असणाऱ्यांना पाठवण्यासाठी खास गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा तुमच्यासाठी निवडून संकलित केल्या आहेत.

              गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे,
ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

अक्षर ज्ञान नाही, तर गुरुने शिकवले जीवनाचे ज्ञान,
गुरुमंत्र आत्मसात केला, तर भवसागर ही कराल पार,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

आई-वडिलांनी जन्म दिला, पण गुरुने शिकवली जगण्याची कला,
ज्ञान, चरित्र आणि संस्कारांची शिकवण आम्हाला मिळाली आहे,
अशा आमच्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

आधी गुरुसी वंदावे,
मग साधन साधावे,
गुरु म्हणजे माय बापं
नाम घेता हरतील पापं,
गुरुपौर्णिेमेच्या शुभेच्छा!

शांतिचा पाठ पठवून, अज्ञानाचा मिटवला अंध:कार,
गुरुने शिकवले आम्हाला, कसा मिळवावा रागावर प्रेमाचा विजय,
अशा माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

विनयफलं सुश्रूषा गुरुसुश्रूषाफलं श्रूतं ज्ञानम|
ज्ञानस्य फलं विरति: विरति फलं चाश्रवनिरोध:|
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण,
लाख रुपये कमावून सुद्धा, तुम्ही आहात त्याहून अनमोल,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आई माझी गुरु, आई माझी कल्पतरु,
माझ्या प्रिय आईला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करुन सोडी, सकळं जना,
तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरुविण कोण दाखविल
वाट हा आयुष्याचा पथ हा दुर्गम,
अवघड डोंगर घाट,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

योग्य काय अयोग्य काय ते तुम्ही शिकवता,
खोटे काय खरे काय ते नीट समजावता,
जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरु म्हणजे परिस आणि शिष्य म्हणजे लोखंड,
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरु  आणि शिष्य जगात दोनच वर्ण,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

हिऱ्याला पैलू पाडतो तो गुरु,
जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु,
जीवनातला खरा आनंद  शोधायला शिकवतो  तो गुरु,
आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
=========================================

--लीनल गावडे
-------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                      ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================