II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 05:52:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II गुरुपौर्णिमा II
                                  ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही काही खास संदेश शोधत असाल तर तुमचा शोध थांबवा कारण मेसेज स्वरुपात पाठवता येतील असे खास गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश खास तुमच्यासाठी निवडले आहेत.

                गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
ज्यांनी मला घडवलं या
जगात लढायला शिकवलं, जगायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरु जगाची माऊली, सुखाची सावली,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

आई वडील प्रथम गुरु,
त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरु,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास देणाऱ्या
विश्वातील सर्व गुरुंना वंदना
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरु हा संतकुळीचा राजा,
गुरु हा प्राणविसावा माझा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

होतो गुरु चरणाचे दर्शन,
मिळे आनंदाचे अंदन,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा,
आणि एकच चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा,
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरु आहेत सगळ्यात महान,
जे देतात सगळ्यांना ज्ञान,
या गुरुपौर्णिमेला करुया त्यांना प्रणाम
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरुने दिला ज्ञानरुपी वसा,
आम्ही चालवू हा पुढे वारसा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरुशिवाय ज्ञान नाही,
ज्ञानशिवाय आत्मा नाही,
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म,
सगळी आहे गुरुची देन,
शुभ गुरु पौर्णिमा!

तुजविण न मिळे ज्ञान, ज्ञानविण जगी न होई सन्मान,
जीवन भवसागर तराया, चला वंदुया गुरुराया,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

सतत पाठीराख्या राहणाऱ्या
ज्वलंत ज्योतिसारख्या तेवणाऱ्या
आणि अचूक मार्गदर्शन करणाऱ्या
गुरुला वंदन करतो,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान,
गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

शिकवता शिकवत आपणास आकाशाला
गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे
आपले शिक्षक..
माझ्या सगळ्या शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो,
कारण माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
=========================================

--लीनल गावडे
-------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================