II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-10

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 06:03:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II गुरुपौर्णिमा II
                                  ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     गुरूपौर्णिमा शायरी मराठी-गुरूंचे माहात्म्य सांगण्यासाठी अनेक वेळा शायरीही रचण्यात आली आहे. अशा गुरूंसाठी लिहीलेल्या शायरी (Guru Purnima Shayari) तुमच्यासाठी शेअर करत आहोत.

            गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
अक्षर हे फक्त ज्ञान नाही, गुरूने शिकवलं जीवन ज्ञान
गुरूमंत्र आत्मसात करा आणि भवसागर पार करा
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

अक्षरं आपल्याला शिकवतात, शब्दांचा अर्थ सांगतात
कधी प्रेमाने तर कधी ओरडून, जीवन जगणं शिकवतात
हॅपी गुरूपौर्णिमा

गुरूंचा महिना अपार आहे
गुरू उद्याचं अनुमान करतात
आणि शिष्याचं भविष्य घडवतात
गुरूपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

गुरूंच्या चरणी बसून, जीवन जाणा
एकाग्र मनाने मिळेल ज्ञान
चंचल मनाने मिळेल अज्ञान
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरू आहे गंगा ज्ञानाची, करेल पापाचा नाश
ब्रम्हा विष्णू महेश समान, तुटेल भाव पाश
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरू जणू पारस समान आहे
जो लोखंडाला सुवर्णात बदलतो
शिष्य आणि गुरू जगात केवळ दोनच वर्ण आहेत
शुभ गुरू पौर्णिमा

गुरूंचा महिमा अपरंपार
गुरूविन काय आहे शिष्याचा आधार
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा

संस्कारांच्या पायावर आहे गुरूची धार
नीर-क्षीर सम शिष्याने करावा आचार विचार
शुभ गुरू पौर्णिमा शुभेच्छा

मातीपासून मूर्ती बनते, सद्गुरू फुंकती प्राण
अपूर्णालाही करेल पूर्ण गुरू असा आहे महिमा
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरूकडे भेदभाव ठेवू नका
गुरूंपासून राहू नका दूर
कारण गुरूंशिवाय नाही पूर्ण जीवन
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा खूप खूप
=========================================

--लीनल गावडे
-------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================