II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-22

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 06:25:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II गुरुपौर्णिमा II
                                 ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

              गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा--

=========================================
गुरु आणि शिष्य जगात दोनच वर्ण,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Guru aani shishyajagat doncha varn,

Gurupurnimechya shubhechha !!

Guru mahnje dnyancha sagar,gurupurnimechya shubhechha..!!


आई वडील प्रथम गुरु,

त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरु,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Aai vadil pratham guru,

Tyanachyapasun saglyanche astivva suru,

Gurupurnimechya shubhechha..!!


गुरुचा भेदभाव करु नका,

गुरुपासून दूर राहू नका,

गुरुविना माणूस हा डोळ्यातून वाहणार

पाणी आहे, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Gurucha bhedbhav karu naka,

Gurupasun dur rahu naka,

Guruvina manus ha dolyatun vahnaar

Paani aahe,gurupurnimechya shubhechha..!!


तोच गुरु श्रेष्ठ ज्याच्या प्रेरणेने,

एखाद्याचे चरित्र बदलते,

मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीत

रंगत बदलते, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Toch guru shretha jyanchya pranene,

Ekhadyayache charitra badlte,

Mitra toch shetha jyachya sangitat

Rangat badlte, gurupurnimechya hardik shubhechha..


गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर...

गुरु साक्षात परब्रह्म,

तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुविण कोण दाखविल वाट आयुष्याचा ..!!

Gurubramha guruvishanu,gurudevo maheshwara...

Gurusakshaat parbarmha,

tasmay shri guruve nmaha

Gurupurnimechya hardik shubhechha..!!

Guruvina kon dakhvila vaat aayushyacha..!!


गुरु हा संतकुळीचा राजा,

गुरु हा प्राणविसावा माझा,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Guru ha santkulicha raja ,

Guru ha pranavisava maza,

Gurupurnimechya shubhechha..!!
=========================================

--by Wishes Marathi
-----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेस मराठी ०७.कॉम)
                    -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================