दिन-विशेष-लेख-महाकवी कालिदास दिन-A

Started by Atul Kaviraje, July 05, 2023, 04:23:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                               "महाकवी कालिदास दिन"
                              -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-05.07.2023-बुधवार आहे. ५ जुलै-हा दिवस "महाकवी कालिदास दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

            कालिदास दिन आषाढ प्रतिपदेला का साजरा करतात ? कविश्रेष्ठ कालिदास कोण होता ?--

     ज्याच्या काव्यातील एका उल्लेखामुळे तो दिवस त्याच्या नावाने ओळखला जातो. केवळ संस्कृत वाङ्मयातच नव्हे, तर संपूर्ण जागतिक वाङ्मयांत कविकुलगुरू कालिदासाचे स्थान अद्वितीय आहे. कविकुलगुरू कालिदासाविषयी आणि त्याच्या रंजक साहित्याविषयी जाणून घेणे रंजक ठरेल.

                  कालिदास दिन--

     आज 'महाकवी कालिदास दिन.' कालिदासाची जन्मतिथी उपलब्ध नाही, पण मेघदूतातल्या 'आषाढस्य प्रथम दिवसे' या शब्दयोजनेमुळे कालिदास या तिथीशी एवढा जोडला गेला की, 'आषाढ प्रतिपदा' हा दिवस 'कालिदास दिन' म्हणून साजरा केला जातो. संस्कृत साहित्यातील कालिदास हा असा एकमेव साहित्यकार आहे की, ज्याच्या काव्यातील एका उल्लेखामुळे तो दिवस त्याच्या नावाने ओळखला जातो. केवळ संस्कृत वाङ्मयातच नव्हे, तर संपूर्ण जागतिक वाङ्मयांत कविकुलगुरू कालिदासाचे स्थान अद्वितीय आहे.

               आषाढ प्रतिपदेला कालिदास दिन का साजरा करतात ?--

     महाकवी कालिदासाने 'मेघदूत' नावाचे खंडकाव्य लिहिले. या काव्यातील दुसरा श्लोक 'आषाढस्य प्रथम दिवसे' हे सूचित करतो.

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्त: स कामी,
नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठ: ।
आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं,
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।

     या श्लोकात यक्षाचं वर्णन केलेलं आहे. या यक्षाला आषाढाच्या पहिल्या दिवशी रामगिरीच्या टेकडीवर बाष्पयुक्त ढग दिसला. या ढगाला आपला दूत समजून यक्ष प्रिय पत्नीला द्यायचा निरोप सांगतो. हा निरोप आणि निरोपाच्या अनुषंगाने येणारे काव्य म्हणजे मेघदूत होय. या श्लोकात येणाऱ्या उल्लेखामुळे आषाढ प्रतिपदा कालिदास दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

                 कविश्रेष्ठ कालिदास कोण होता ?--

     भारतीय परंपरा आणि पाश्चात्त्य अभ्यासक या दोघांनीही सर्वश्रेष्ठ संस्कृत कवी म्हणून कालिदासाचा गौरव केला. त्याचा काळ कोणताही असो, त्याने काळमार्गावर उमटवलेली मुद्रा इतकी ठळक आहे की, दीड हजार वर्षे उलटून गेली तरी त्याचे स्थान अढळ आहे. 'पुरा कवीनां गणनाप्रसंगे कानिष्ठिकाधिष्ठित कालिदास:' अर्थात – पूर्वी कवींची गणना करताना कानिष्ठिकेवर म्हणजे करंगळीवर कालिदासाचे नाव घेतले गेले. तत्तुल्यकवेराभावात – अजूनही त्या तोडीच्या दुसर्‍या कवीचे नाव आढळले नाही, म्हणून 'अनामिका सार्थवती बभूव' अनामिका हे बोटाचे नाव सार्थ झाले. म्हणूनच, या श्लोकात कालिदासाची सर्व महती आहे, असे वाटते.

--वसुमती करंदीकर
------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकसत्ता.कॉम)
                      ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.07.2023-बुधवार.
=========================================