दिन-विशेष-लेख-अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन-E

Started by Atul Kaviraje, July 09, 2023, 09:25:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                              "अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन"
                             -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-09.07.2023-रविवार आहे.  ९ जुलै-हा दिवस "अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     प्रांतीय न्यायालये अलग असून ती फक्त प्रांतीय बाबींतच निवाडा देतात. राष्ट्रीय बाबींकरिता सर्वोच्च न्यायालय व त्याखालील न्यायालये आहेत. सैन्याचे पायदळ, गिरिपथके, यंत्रसज्‍जदळ, तोफखाना, विमानगामी पथके असे विभाग आहेत. २० ते ४५ वयाच्या नागरिकांना २ वर्षे नाविकदलात आणि एक वर्ष पायदळ अथवा हवाईदलात काढणे आवश्यक असते. १९७३ च्या माहितीनुसार खडे सैन्य ८५,००० व राखीव अडीच लाख आहे नौदलात आठ विनाशिका, तीन फ्रिग्रेट, दोन पाणबुड्या आणि ५० लहान बोटी आहेत आणि हवाई दलात ३०० वैमानिक व २०० लढाऊ विमाने, शिवाय काही बाँबफेकी व वाहतूकविमानेही आहेत.

     अर्जेंटिनाच्या राजकारणात लष्करी अधिकाऱ्‍यांनी अनेकदा हस्तक्षेप केल्याने सैन्याधिकारी व मुलकी शासन यांमध्ये अधिकारसंघर्ष नेहमीचाच आहे व मुलकी राष्ट्रपतीचे जीवन कष्टप्रद व धोक्याचेही झाले आहे.

     अर्जेंटिना संयुक्त राष्ट्रे, अमेरिका ऐक्य संघ इ. बहुतेक आंतरराष्ट्रीय संघटानांचा सदस्य आहे.

     आर्थिक स्थिती: दक्षिण अमेरिकेत आर्थिक दृष्ट्या अर्जेंटिना सर्वांत पुढारलेला आहे. भौगोलिक दृष्ट्या त्याच्याहून फक्त ब्राझीलच मोठा आहे आणि व्हेनेझुएला सोडल्यास अर्जेंटिनाचे दरडोई उत्पन्न सर्वोच्च आहे. बहुसंख्य लोकवस्ती शहरी (६१%) आहे आणि त्यात मध्यम वर्गाचे प्रमाण मोठे आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरी-अखेरीस व विसाव्याच्या सुरवातीस अर्जेंटिनात यूरोपीय भांडवल व आप्रवासी यांचा लोंढा सुरु झाला. पँपासमध्ये शेती व पशुधन यांची प्रचंड वाढ झाली आणि यूरोप, विशेषतः ब्रिटन, येथील मांस व गहू यांची बाजारपेठ याने काबीज केली. दुसऱ्या महायुद्धानंतरही अर्जेंटिनाचा अग्रक्रम काही वर्षे कायम राहिला.

     म्हणण्यासारखी खनिजसंपत्ती नसूनही अर्जेंटिनातील उद्योग व कारखाने प्रगत आहेत. महायुद्धात व नंतर काही काळ अर्जेंटिनाची भरभराट हेवा वाटण्याजोगी होती. परंतु १९५० नंतर पेरॉनच्या एकांगी अर्थव्यवस्थेमुळे त्यास उतरती कळा लागली. १९५८ पासून ही परिस्थिती पालटत असून परकीय भांडवल पुन्हा देशात येऊ लागले आहे. माल तयार करणारे उद्योग, चालू व होऊ घातलेले कारखाने यांनाच परकीय भांडवलाचा उपयोग व्हावा, असे शासनाचे धोरण आहे. अर्जेंटिनात पैसा गुंतविणाऱ्‍यांमध्ये विशेषतः अमेरिका, स्वित्झर्लंड, ग्रेट ब्रिटन, नेदर्लंड्‌स, पश्चिम जर्मनी, फ्रान्स व इटली हे देश प्रमुख आहेत.

     अर्जेंटिनात सुमारे २८ कोटी हेक्टर जमिनीपैकी ४१% चराऊ, ३२% जंगलव्याप्त व ११ टक्के शेतीखाली आहे. बाकीची पडून आहे. दहा लाखांहून अधिक लोक शेतीव्यवसायात आहेत. १९६६ च्या नोंदणीनुसार ४,७१,७५६ शेते आहेत. यांतील ५० टक्के मालकच वाहतात, १७ टक्के खंडावर आहेत आणि उरलेली शासन किंवा समाईक भांडवल कंपन्यांच्या मालकीची आहेत. यांची वाटणी समतोल नाही. उदा., ८६ टक्के शेतमालकांकडे फक्त १६ टक्के तर ०·५ टक्के मालकांकडे ३३·५ टक्के जमीन आहे. परंतु अपुरी लोकसंख्या आणि अफाट शेतजमीन यांमुळे भूमिहीनांच्या गर्दीची वा असमाधानाची झळ देशास लागलेली नाही.

     पशुसंवर्धनाकरिता इतके अनुकूल हवापाणी वा मृदा इतरत्र क्वचितच आढळते. पशुधनाबाबत भारत, अमेरिका, रशिया यांच्या खालोखाल अर्जेंटिनाचा क्रम लागतो. वर्षभर चरता येईल असे गवत भरपूर होते आणि अल्फाल्फा गवताची लागवडही लाखो हेक्टरांत झालेली आहे. पँपासमध्ये निर्यातीकरिता विशिष्ट प्रकारच्या गाईबैलांची जोपासना केली असून इतर ठिकाणची जनावरे स्थानिक उपयोगाकरिता वापरतात. १९६७ मध्ये गाईबैल ५·४९ कोटी, मेंढ्या ४·६ कोटी, डुकरे ३५ लक्ष व घोडे ४८ लक्ष होते. दर वर्षी सरासरी ९० लाख जनावरांची कत्तल केली जाते. यातील २० टक्के मांस निर्यात होते व ८० टक्के देशातच खपते. तसेच अर्जेंटिनातील मेंढ्यांची संख्याही जगात तिसऱ्‍या क्रमांकाची असून यांपैकी एक कोटी मेंढ्या दर वर्षी मारल्या जातात. यातील ३३% निर्यात होते. दुग्धोत्पादन, कोंबड्या व डुकरे यांचा धंदाही लघुउद्योग म्हणून केला जातो. सु. तीन कोटी हेक्टर जमीन शेतीखाली असून अन्नधान्यांपैकी गव्हाचे उत्पादन १० टक्के आहे. हा देश गव्हाच्या निर्यातीत अग्रेसर आहे. बार्ली, ओट व राय यांचेही पीक उल्लेखनीय आहे. यांशिवाय जवस, सूर्यफूल, ऑलिव्ह वगैरे तेले देणारी पिके निघतात. कापूस, ऊस, भात, तंबाखू, येर्बामाते वगैरेंचे उत्पादन पुरेसे होते. फळभाज्यात देश स्वयंपूर्ण असून मेंदोसा प्रांतात विविध मद्ये तयार होतात. सुमारे नऊ कोटी हेक्टर जमिनीवर अरण्ये असून उत्तम कठीण लाकूड भरपूर निघते. मात्र मऊ लाकूड आयात करावे लागते. देशातील सरोवरे व नद्या आणि भोवतालचा समुद्र यांत मासे भरपूर आहेत, परंतु अर्जेंटिनास माशांपेक्षा मांसच प्रिय असल्याने मच्छीमारीकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही.

--शहाणे, मो. ज्ञा.
---------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश्वकोश.मराठी.गोव.इन)
                   ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.07.2023-रविवार.
=========================================