१०-जुलै-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, July 10, 2023, 09:04:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१०.०७.२०२३-सोमवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "१०-जुलै-दिनविशेष"
                                 -------------------

-: दिनविशेष :-
१० जुलै
Global Energy Independence Day
बहामाचा स्वातंत्र्यदिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०००
विज्ञानप्रसारासाठीच्या कार्याबद्दल नेहरू तारांगणातर्फे दिला जाणारा 'मनुभाई मेहता पुरस्कार' शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर
२०००
नायजेरियात एका फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन गळणारे तेल गोळा करण्यासाठी आलेले २५० जण जळुन ठार झाले.
१९९५
म्यानमारमधील लोकशाही? चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता
१९९२
संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या 'इन्सॅट २-ए' या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण
१९९२
आर्वी येथील 'विक्रम इनसॅट भू-उपग्रह केंद्र' राष्ट्राला अर्पण
१९९२
मादक द्रव्यांच्या तस्करीबद्दल पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिएगा यांना फ्लोरिडात ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. नंतर ही शिक्षा कमी करुन ३० वर्षांची करण्यात आली.
१९७८
मॉरिटानियात लष्करी उठाव झाला.
१९७८
मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ स्थापन करण्यात आले.
१९७३
पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.
१९७३
बहामाजला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९६२
टेलस्टार-१
'टेलस्टार-१' हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह यशस्वीपणे अंतराळात प्रक्षेपित
१९४७
ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट अ‍ॅटली यांच्या शिफारशीवरून मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.
१९४०
बॅटल् ऑफ ब्रिटन
लंडनमधून एक सैनिक येणाऱ्या विमानांची टेहळणी करताना
'बॅटल् ऑफ ब्रिटन' या नावाने ओळखले जाणारे हवाईयुध्द सुरू. सुमारे तीन महिने आणि तीन आठवडे हे युद्ध चालले. नाझी जर्मन विमानदलाने इंग्लंडवर प्रचंड मोठया संख्येने विमाने पाठवून बॉम्बहल्ला सुरू केला. या युद्धात २३, ००२ नागिरक ठार तर ३२, १२८ नागरिक जखमी झाले. ३१ ऑक्टोबर १९४० रोजी इंग्लंडचा विजय होऊन हे युद्ध संपले. या युद्धातील इंग्लंडचा विजय हा दोस्त राष्ट्रांसाठी (Allied Forces) एक महत्त्वपूर्ण विजय ठरला. या युद्धावर 'Battle of Britan' (१९६९) नावाचाच एक चित्रपटही निघाला आहे.
१९२५
अवतार मेहेरबाबा यांनी आपल्या मौनव्रताची सुरूवात केली. हे व्रत त्यांनी सलग ४४ वर्षे त्यांच्या मृत्यूपर्यंत पाळले.
१९२५
'तास' या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना
१९२३
मुसोलिनीने इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.
१८९०
वायोमिंग अमेरिकेचे ४४ वे राज्य बनले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९५०
परवीन सुलताना
२०११ मधील छायाचित्र
'बेगम' परवीन सुलताना – पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका, संगीत नाटक अकादमी पारितोषिक (१९९९), पद्मभूषण (२०१४)
१९४९
'लिटिल मास्टर' सुनील मनोहर तथा 'सनी' गावसकर – क्रिकेटपटू व समालोचक
१९४५
व्हर्जिनिया वेड – इंग्लिश लॉन टेनिस खेळाडू
१९४३
आर्थर अ‍ॅश – अमेरिकन टेनिस खेळाडू
(मृत्यू: ६ फेब्रुवारी १९९३)
१९४०
लॉर्ड मेघनाद देसाई – अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या 'हाऊस ऑफ लॉर्डस'चे सभासद
१९२३
गुरूनाथ आबाजी तथा जी. ए. कुलकर्णी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गूढकथालेखक
(मृत्यू: ११ डिसेंबर १९८७)
१९१३
पद्मा गोळे – कवयित्री
(मृत्यू: १२ फेब्रुवारी १९९८)
१९०३
प्रा. रामचंद्र भिकाजी तथा रा. भि. जोशी – साहित्यिक, प्रवासवर्णन, कथा, अनुवाद, व्यक्तिचित्रे असे अनेक प्रकार त्यांनी हाताळले. वाटचाल, घाटशिळेवरि उभी या त्यांच्या काही प्रसिद्ध साहित्यकृती आहेत.
(मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९१ - मुंबई)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.07.2023-सोमवार.
=========================================