दिन-विशेष-लेख-मातृ सुरक्षा दिन

Started by Atul Kaviraje, July 10, 2023, 09:18:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                                   "मातृ सुरक्षा दिन"
                                 -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-10.07.2023-सोमवार आहे.  १० जुलै-हा दिवस "मातृ सुरक्षा दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     २००५ सालापासून १० जुलै हा दिवस 'मातृ सुरक्षा दिन' मानला जातो. जागतिक आरोग्य संघटनेनं याची जगभर अंमलबजावणी सुरू केली. मातेचं संगोपन आणि मातृत्वादरम्यानच्या कालावधीत होणाऱ्या मातांच्या मृत्युदरात झालेली वाढ, त्यांची होणारी परवड रोखण्यासाठी हा प्रयत्न सुरू झाला.

     दरवर्षी 10 जुलैला का साजरा केला जातो मातृ सुरक्षा दिवस? कधी आणि कशी झाली याची सुरुवात जाणून घ्या-

     आज म्हणजेच 10 जुलै रोजी जगभरात 'मातृ सुरक्षा दिन' साजरा केला जातो. साल 2005 पासून जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याची जगभर अंमलबजावणी सुरू केली. आईचे आरोग्य आणि विशेषतः गरोदर पणाच्या कालावधीत होणा-या मृत्युदरात झालेली वाढ, याबाबत जनजागृकता निर्माण करण्यासाठी तसेच यावर उपाययोजना करण्याची गरज भासवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आता त्यासाठी 10 जुलै हाच दिवस का निवडला असावा? तर यामागे सुद्धा एक खास कारण आहे. उद्या म्हणजेच 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस (World Population Day) साजरा केला जातो. लोकसंख्येची वाढ आणि नवमातांचे आरोग्य (New Mother's Health) याचा संबंध जोडून 10 जुलै हा दिवस निवडण्यात आलेला आहे. भारतामध्ये पिठोरी अमावस्या दिनी मातृदिन का साजरा केला जातो?

     तज्ञांच्या माहितीनुसार, गरोदर महिलांमध्ये होणाऱ्या मृत्यूचे मुख्य कारण हे रक्तदाबाशी संबंधित समस्या असतात. प्रसूतीच्या वेळी रक्तस्त्राव वाढणे, गरोदर असताना सतत रक्तदाब कमी अधिक होत राहणे यामुळे महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यातही हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या माता या अधिक धोक्याच्या ठिकाणी असतात. मुळातच गरोदर महिलांच्या अपघाती मृत्यूपेक्षाही आरोग्याची योग्य काळजी न घेतल्याने निर्माण होणाऱ्या समस्या अधिक आहेत. याशिवाय दोन अपत्यांमधील सुरक्षित अंतर, गरोदरपणात घ्यायची काळजी या सर्व बाबीत सुद्धा जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी या दिवसाची सुरुवात करण्यात आली आहे. Pregnancy नंतर फिट राहण्यास मदत करतील या '5' गोष्टी, वजन कमी करण्यास येतील कामी

     आपल्याला ठाऊकच आहे की, दरवर्षी मदर्स डे हा मोठया उत्साहात साजरा केला जातो. पण सुरक्षित मातृत्व साजरे करण्यासाठी त्याला प्रेरणा देण्यासाठी हा आजचा मातृ सुरक्षा दिवस सुद्धा खास आहे. यानिमित्त जगभरातील सर्व मातांना शुभेच्छा आणि यापुढे नवमातांच्या मृत्यूचा दर घटून नाहीसाच व्हावा अशी सदिच्छा आम्ही व्यक्त करतो.

--Siddhi Shinde
------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.लेटेस्टली.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.07.2023-सोमवार.
=========================================