दिन-विशेष-लेख-जागतिक लोकसंख्या दिन

Started by Atul Kaviraje, July 11, 2023, 09:24:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                              "जागतिक लोकसंख्या दिन"
                             -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-11.07.2023-मंगळवार आहे.  ११ जुलै-हा दिवस "जागतिक लोकसंख्या दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्र्य, बेकारी, रोगराई असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. अशा प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन (World Population Day) म्हणून साजरा केला जातो.

     जगभरात दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन (World Population Day) म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केलं जातं. 11 जुलै 1987 रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले.

     जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केलं जातं.

     जगभरात दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन (World Population Day) म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केलं जातं. 11 जुलै 1987 रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले. त्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघटनेने याची दखल घेवून 1989 सालापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले.

              जागतिक लोकसंख्या दिनाचा इतिहास :--

     संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या तत्कालीन गव्हर्निंग कौन्सिलने 1989 मध्ये त्याची स्थापना केली होती. 11 जुलै 1990 रोजी हा दिवस पहिल्यांदा 90 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये साजरा करण्यात आला. तेव्हापासून, अनेक UNFPA राष्ट्रीय कार्यालये तसेच इतर संस्था आणि संस्थांनी सरकार आणि नागरी समाज यांच्या सहकार्याने जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला आहे.

     त्यांच्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी, UNFPA संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीच्या आत आणि पलीकडे, सरकार, गैर-सरकारी संस्था, नागरी समाज, विश्वास-आधारित संस्था, धार्मिक समुदायाचे नेते आणि इतरांसह, पक्षांच्या विस्तृत श्रेणीसह सहयोग करते. जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यासाठी सुमारे 8 उद्दिष्टे आहेत.

               जागतिक लोकसंख्या दिनाचा उद्देश :--

     या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकसंख्या वाढीमुळे निसर्गाच्या स्थिर विकासावर होणार्‍या सर्व नकारात्मक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे असा आहे. जागतिक स्तरावर हा दिवस परिसंवाद, चर्चा, शैक्षणिक सत्रे, सार्वजनिक स्पर्धा, घोषणा, कार्यशाळा, वादविवाद, गाणी इत्यादी आयोजित करून साजरा केला जातो.

--By: एबीपी माझा वेब टीम
--Edited By: प्रिया मोहिते
-------------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.abp लाईव्ह.कॉम)
                  -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.07.2023-मंगळवार.
=========================================