खेळ मांडला

Started by mkapale, July 12, 2023, 09:11:36 AM

Previous topic - Next topic

mkapale

फु बाई फु फुगडी फु
खेळ पाहून राज्याचा दमलास का तू...मतदारा दमलास का तू...

मत दिलं एकाला आता तो झाला दोन
त्यालाच कळेना समोरचा कोण आणि बाजूचा कोण
आधी होते गणित एकाचे दोन
आता झाली भूमिती त्रिकोण चौकोन...आता फुगडी फु...

फु बाई फु फुगडी फु
खेळ पाहून राज्याचा दमलास का तू...मतदारा दमलास का तू...

काल जेवले एकत्र थाळी आज खातात माती
पदासाठी खेळतात संगीत खुर्ची घरातील कोण कोण
पळता पळता समजेना कशासाठी पळतोय
सामान्यांना कळेना संगीत वाजतोय कोण..आता फुगडी फु...

फु बाई फु फुगडी फु
खेळ पाहून राज्याचा दमलास का तू...मतदारा दमलास का तू...

दे मला खुर्ची नाहीतर मी जातो
जिथून आलास तिथे तरी तुला घेतोय कोण
पावसातल्या पुरासारखे वाहत जातंय सारं
लोकांच्या घरी दारी फोहोचले कोणाचे कोण..आता फुगडी फु...

फु बाई फु फुगडी फु
खेळ पाहून राज्याचा दमलास का तू...मतदारा दमलास का तू...

वर चढता चढता जमीन झाली दूर
ज्यांनी आणलं निवडून त्यांना विचारतं कोण
स्पष्ट सगळे बोलतात पण नितळ नाही काही
प्रजा करते विचार..नेमका पुढारी कोण...आता फुगडी फु...

फु बाई फु फुगडी फु
खेळ पाहून राज्याचा दमलास का तू...मतदारा दमलास का तू...