सगळ्यांची स्वप्न पूर्ण करता करता माझीच जरा मागेच राहिली....

Started by Rushi.VilasRao, July 15, 2023, 09:49:01 AM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

कॉलेज मधुन बाहेर पडून आता वर्ष झाल.... कॉलेज मधे असताना विचार मनात रोज रंगायचा इथून बाहेर पडलो की स्वतः च्या जीवावर काही तरी करायच....

कूठे तरी चांगल्या पगाराची नोकरी करून किंवा चांगला एखादा धंदा करून आई वडिलांना खुश ठेवायच...भाऊ बहिणीची हौस पुरवायची अन् त्यांना पण मार्गी लागायला शेवट पर्यंत झटायच...

आता आयुष्य जरा वेगळच आहे....
आयुष्याचा हा खेळ थोडा थोडका नाही खूपच जास्त चित्ताकर्षक आहे....
जगण्याची धडपड करण्यासाठी रोज नव नव्या परीक्षा आहेत...

रोज सकाळी ऑफिस जाणे....
तेच तेच आयटी चे प्रोग्राम्स, रोज नव्या मीटिंग्स...
दोन वेळेच्या जेवणासाठी लावलेली मेस आणि मेस मधली तेच तेच डाळ कमी अन् पाणी जास्त असणारे वरण भात.....
रोज हा विचार आता मनात सलतो...
कधी बदलेल का हे आयुष्य असा प्रश्न पडतो....
रोज रात्री झोपताना नाही जाणार उद्यापासून कामावर हा विचार करतो....

रात्री चा हा विचार विचारच राहून जातो....
रोज सकाळी उठून पुन्हा मी कामाला निघतो....

मनातली स्वप्न पूर्ण करायला शहरात आलो....
गावातल शुद्ध आयुष्य सोडून शहराच्या दूषित कचाट्यात सापडलो
स्वप्न पूर्ण करणे तर महत्त्वाचे होतेच.... उपजीविका भागवण्या साठी मिळवत असणे गरजेचे होते.....
जवाबदारी आता यातून बाहेर पडू देत नाही...
बाहेर पडायचा प्रयत्न केला की फासा अजून आवळला जातो....

निवांत आयुष्याची कहाणी आता मोजकीच राहिली.....
परी कथेच्या कथे प्रमाणे काल रात्रीच्या स्वप्नांत च राहून गेली.....