शहाणपणाचं ज्ञान

Started by mkapale, July 17, 2023, 10:52:44 AM

Previous topic - Next topic

mkapale

वय वाढता , वाढवते ज्ञान
शिक्षण, जीवनाचे प्रत्येक पान
वापराची नसे मात्र जाण
मग भासते ज्ञानही अज्ञान

पदवीचे फलक दारी
समाज म्हणे मानकरी
जीवनाची चाळणी लागता
वाटे कमी ज्ञानाची पायरी

ज्ञान अन समज मिसळून
साकारते ते शहाणपण
केवळ ज्ञान पोकळ बांबू
वेळू बनवी शहाणपण

चळत पदव्या पुस्तकांची
न चेतवे हुशारीची ज्योत
रांगा लावी कई ज्ञानियांच्या
शहाणा तो एकलाच खोत

शिकावे परी शहाणे असावे
निरखून जीवनाचे धडे वाचावे
परीक्षा रोज, लाभती न गूण
स्वःप्रगती हेचि तुलनेस घ्यावे