२०-जुलै-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, July 20, 2023, 03:30:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२०.०७.२०२३-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                 "२०-जुलै-दिनविशेष"
                                -------------------

-: दिनविशेष :-
२० जुलै
आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०००
अभिनेते दिलीपकुमार यांना 'राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार' जाहीर
१९७६
मंगळाच्या पृष्ठभागावर प्रथमच व्हायकिंग-१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.
१९७३
केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.
१९६९
अपोलो-११ या अंतराळयानातुन गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला. त्यानंतर लगेच एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर उतरला.
१९६०
सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. भंडारनायके या अर्वाचीन जगातील प्रथम निर्वाचित स्त्री राष्ट्रप्रमुख बनल्या.
१९५२
फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली.
१९४९
इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.
१९४४
दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अ‍ॅडॉल्फ हिटलर बचावला.
१९२६
मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
१९२४
आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ संघटनेची (FIDE) स्थापना झाली.
१९०८
बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने 'बँक ऑफ बडोदा' ची स्थापना झाली.
१९०३
फोर्ड मोटर कंपनीतुन पहिली मोटारगाडी बाहेर पडली.
१८७१
ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.
१८२८
'मुंबापूर वर्तमान' हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
१४०२
तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९५०
नसिरुद्दिन शाह – चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक
१९२९
राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता
(मृत्यू: १२ जुलै १९९९)
१९१९
सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक
(मृत्यू: ११ जानेवारी २००८)
१९२१
पंडित सामताप्रसाद – बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक, तबल्यातील अक्षरांचा कमालीचा सुस्पष्टपणा आणि त्याबरोबरच गोडवा, तबला - डग्ग्याच्या नादातील समतोल, बोलांच्या आकर्षकतेचा उत्कृष्ट अविष्कार आणि या सर्वांना व्यापून टाकणारी प्रासादिकता ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
(मृत्यू: ३१ मे १९९४)
१८३६
सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर
(मृत्यू: २२ फेब्रुवारी १९२५ - केंब्रिज, केंब्रिजशायर, इंग्लंड)
१८२२
ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ
(मृत्यू: ६ जानेवारी १८८४)
ख्रिस्त पूर्व ३५६
अलेक्झांडर द ग्रेट – मॅसेडोनियाचा राजा
(मृत्यू: ११ जून ख्रिस्त पूर्व ३२३)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१९
शीला दिक्षीत – दिल्लीच्या मुख्यमंत्री
(जन्म: ३१ मार्च १९३८)
१९९५
शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक
(जन्म: ४ डिसेंबर १९३५)
१९९४
डॉ. रघुनाथ विनायक हेरवाडकर
डॉ. रघुनाथ विनायक हेरवाडकर – बखर वाङमयकार
(जन्म: २५ सप्टेंबर १९१५)
१९७३
ब्रूस ली
ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ
(जन्म: २७ नोव्हेंबर १९४०)
१९७२
गीता दत्त – अभिनेत्री आणि गायिका
(जन्म: २३ नोव्हेंबर १९३०)
१९६५
बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक
(जन्म: १८ नोव्हेंबर १९१०)
१९५१
अब्दूल्ला (पहिला) – जॉर्डनचा राजा
(जन्म: २ फेब्रुवारी १८८२)
१९४३
वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक
(जन्म: २१ जानेवारी १८८२)
१९३७
गुग्लिएल्मो मार्कोनी – रेडिओचे संशोधक
(जन्म: २५ एप्रिल १८७४)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.07.2023-गुरुवार.
=========================================