समज

Started by mkapale, July 21, 2023, 01:49:41 PM

Previous topic - Next topic

mkapale

समज

डोळ्यात तिच्या दिसे
मला भावना मायेची
नकार दिल्यावर का आता
भासे तीच नजर रागाची

कारण असेल नकाराचं
तशी पोर ती संस्काराची
मला वाटे सदा का आता
माझी पातळीच खालची

वादळ वाढत गेले मनात
उत्तरे न मिळती प्रश्नांची
विचारू कारण का आता
कमी आहे कुण्या गोष्टीची

सामोरा गेलो तर तिने
केली सुरुवात बोलण्याची
तुझी होऊ कशी रे आता
आहे मी खालच्या जातीची

समज हा तुझा आहे वेडा
पर्वा नाही मला सगळ्याची
बाबांच्या नजरेत रे आता
दिसली खोल दरी समाजाची

प्रेम असले जरी सच्चे
नाही आस , झेप घेण्याची
उडू पाही प्रेम रे आता
तरी , साथ ना तोडवेल नात्यांची

समज बदलेल का कधी
तुझ्या माझ्या समाजाची?
निरोप घेते तुझा रे आता
अधुरी गोष्ट प्रेमाची...गोष्ट प्रेमाची