२१-जुलै-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, July 21, 2023, 05:53:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०७.२०२३-शुक्रवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "२१-जुलै-दिनविशेष"
                                 -------------------

-: दिनविशेष :-
२१ जुलै
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००२
जगभर दूरसंचार सेवा पुरवणार्‍या 'वर्ल्ड कॉम' या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
१९८३
अंटार्क्टिकावरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सिअस या पृथ्वीवरील आत्तापर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.
१९७६
आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या
१९६०
सिरीमावो बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान होत.
१९४४
२० जुलै १९४४ रोजी अ‍ॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी देण्यात आले.
१८३१
बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९४७
चेतन चौहान – सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य
१९३४
चंदू बोर्डे – क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष
१९३०
डॉ. रा. चिं. ढेरे – ज्येष्ठ साहित्यिक व प्रख्यात इतिहास संशोधक
(मृत्यू: १ जुलै २०१६)
१९१०
वि. स. पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्‍मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक
(मृत्यू: १६ मार्च १९९०)
१८९९
अर्नेस्ट हेमिंग्वे – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक
(मृत्यू: २ जुलै १९६१)
१८५३
शंकर बाळकृष्ण दीक्षित – ज्योतिर्विद, पाश्चिमात्य व पौर्वात्य जोतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक
(मृत्यू: २७ एप्रिल १८९८)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००९
गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका
(जन्म: ५ मार्च १९१३)
२००१
शिवाजी गणेशन
२००१ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
विझुपुरम चिन्नया मनरायार तथा शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते
(जन्म: १ आक्टोबर १९२८)
१९९५
सज्जाद हुसेन – संगीतकार व मेंडोलीनवादक
(जन्म: १५ जून १९१७ - सीतामहू, मंदसौर, मध्य प्रदेश)
१९९७
राजा राजवाडे – साहित्यिक
(जन्म: १ जानेवारी १९३६)
१९९४
डॉ. र. वि. हेरवाडकर – इतिहास संशोधक, वाङ्‌मय समीक्षक, मराठी बखर वाङ्‌मयाचे व्यासंगी अभ्यासक
(जन्म: ? ? ????)
१९७२
जिग्मे दोरजी वांगचुक – भूतानचे राजे
(जन्म: २ मे १९२९)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.07.2023-शुक्रवार.
=========================================