दिन-विशेष-लेख-वनसंवर्धन दिन-B

Started by Atul Kaviraje, July 23, 2023, 05:40:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                  "दिन-विशेष-लेख"
                                   "वनसंवर्धन दिन"
                                 -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-23.07.2023-रविवार आहे.  २३ जुलै-हा दिवस "वनसंवर्धन दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

                         'एक विद्यार्थी, एक झाड'

           वनसंवर्धन व वृक्षारोपण दिनासाठी घोषवाक्य व चारोळ्या--

1) वृक्ष संवर्धन दिनाचा दिवस खास वृक्ष रक्षणाच्या घेऊन ध्यास तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस पृथ्वीला देव मोकळा श्वास..

2) पाहायची असेल जिवसंपदा तर वाचवा वनसंपदा ..!

3) झाडे लावा सृष्टी वाचवा पर्यावरणाचा साधा समतोल लाभेल आरोग्य संपन्नता जीवन आहे अनमोल..

4) भविष्य उद्याचे नव्या पिढीचे संकटात टाकू नका वनांचे करारक्षण उज्वल भविष्याचे हेच धोरण..!

5) जंगल करा घनदाट सळसळेल रक्त मनगटात वृक्षतोड करू नका जीवन धोक्यात टाकू नका..!

     अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या आपल्या मूलभूत गरजा असोत किंवा चंगळवादी संस्कृतीतील चैनीच्या वस्तू असोत. आपली प्रत्येक गरज पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीद्वारेच भागविली जाते. त्यामुळे पृथ्वीविषयी कृतज्ञतेची भावना बाळगणे, आपली पृथ्वी स्वच्छ, सुंदर व हरित ठेवणे, ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. म्हणूनच या

     वनसंवर्धन दिनाच्या निमित्ताने पृथ्वी वाचविण्याच्या कार्यात आपण हातभार लावण्याचा संकल्प करूया व त्या दिशेने कृतीशील होऊया!

--By सकाळ डिजिटल टीम
------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इ सकाळ.कॉम)
                      ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.07.2023-रविवार.
=========================================