रिमझिम पावसातली विरह कविता-गीत-बरसू लागल्या मंद जलधारा,चुंबू लागल्या माझ्या अधरI

Started by Atul Kaviraje, July 24, 2023, 11:44:37 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, रिमझिम पावसातली विरह कविता-गीत ऐकवितो. "टिप-टिप बरसा पानी, पानी ने आग लगाई"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस जुलै महिन्याची ही कृष्ण-मेघांनी झाकोळलेली सोमवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( टिप-टिप बरसा पानी, पानी ने आग लगाई )           
------------------------------------------------------

                  "बरसू लागल्या मंद जलधारा, चुंबू लागल्या माझ्या अधरा"   
                 -------------------------------------------------

बरसू लागल्या मंद जलधारा,
चुंबू लागल्या माझ्या अधरा
अवचित तुझी आठवण आली,
अंगी शिरशिरी देऊन गेली

बरसू लागल्या मंद जलधारा,
चुंबू लागल्या माझ्या अधरा
दाहक स्पर्श तुझा रोमरोमी,
भिनवीत गेलेला ओलेता वारा

मन माझ्या काबूत नाही
मी माझीच शाबूत नाही
तापलेले अंग, पेटलेल्या ज्वाळा,
पाऊस काही विझवीत नाही

सय तुझी देत शहारा
त्यात बरसणाऱ्या पर्जन्य गारा
भिजवून भिनवून, पुलकित रोमांच,
उठती चिंब भिजणाऱ्या शरीरा

अशात ओठांवर तुझे नाव
ओघळणाऱ्या तुषारात अवचित आले
तोच पाऊस, तुझ्या सहवासातील,
अस्पष्ट चित्र डोळ्यांसमोर अवतरले

बुडणाऱ्या नौकेला माझ्या तू
आजवर किनारी लावीत आलास
अस्थिर मनाला, स्थैर्य देताना,
तूच तर तिथे होतास

आजही जेव्हा सागर खवळतो
आजही जेव्हा वीज कडकडते
पाऊस जेव्हा कोसळू लागतो,
आठवण तुझी फिरून येते

बरसू लागल्या मंद जलधारा,
चुंबू लागल्या माझ्या अधरा
भेटीची अधीरता, मनाची तगमग,
तुला कळेल का जरा ?

बरसू लागल्या मंद जलधारा,
चुंबू लागल्या माझ्या अधरा
सरसरता वारा, बरसत्या धारा,
सांगून गेल्या का तुला प्रियकरा ?

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.07.2023-सोमवार. 
=========================================