कोणी कुणाचं नसतं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, July 25, 2023, 03:50:46 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

कोणी कुणाचं नसतं रं देवा
कोणी कुणाचं नसतं ........

जवळ करून दूर आपलेच होतात
फायदा घेणारे आपलेच असतात
तुम्ही सांगा काय करावं देवा
गरिबीत शेवटी आपलेच लोटतात

कोणी कुणाचं नसतं रं देवा
कोणी कुणाचं नसतं ........

मित्र मित्र म्हणून जवळ केले
दगा देऊन सारे परकेच झाले
अवघड वळणावर फाटा देऊन
त्यांनीच शेवटी वाऱ्यावर सोडले

कोणी कुणाचं नसतं रं देवा
कोणी कुणाचं नसतं ........

समजून सांगण्यात आयुष्य जाई
गैरसमज असे झालेत काही
आता सांगू कुणाला दुःख माझे
तेव्हा काय चुकले कळलेच नाही

कोणी कुणाचं नसतं रं देवा
कोणी कुणाचं नसतं ........

प्रेम केलं ते पण गेलं
हात सोडून परकं झालं
काय सांगू व्यथा माझी
शेवटी एकटंपण नशिबी आलं

कोणी कुणाचं नसतं रं देवा
कोणी कुणाचं नसतं.....

देशील दोन घास सुखाने
म्हणून पदरात पाडून घेतो
जरी असेल गरिबी सोबती
सारे दुःख हसून मी सोसतो

कोणी कुणाचं नसतं रं देवा
कोणी कुणाचं नसतं.............

आता देह एकटा झाला
मरण्यास शेवटी मोकळा केला
पण मनाला कुणकुण लागली
तरी देह लेकरांसाठी उभा राहिला

पण कोणी कुणाचं नसतं रं देवा
कोणी कुणाचं नसतं........

असो काही हरकत नाही
जसा आहे तसा मी जगतो
आपलेच सारे आहेत म्हणून
तिरस्कार त्यांचे पदरात घेतो

कोणी कुणाचं नसतं रं देवा
कोणी कुणाचं नसतं.........

कविराज...अमोल....
अहमदनगर

असलो काय
नसलो काय......
कोणाला फरक पडत नाय.....