भेसळ

Started by mkapale, July 25, 2023, 05:43:47 PM

Previous topic - Next topic

mkapale

भेसळ

वाढदिवशी जर तुला आनंदाने केले चकित
होकार येईल तुझा,  मी केले होते भाकीत

द्वाड मित्रांपासूनही ठेवले होते गुपित
पाहिली स्वप्नात लाज तुझ्या गालावर किंचित

कष्टाने साठले ते केले रिकामे माझे संचित
राहीन काही दिवस छोट्या सुखांपासून वंचित

मोठे दुकान मोठी किंमत नाही बसले ते गणित
केक चे छोटे पाकीट घेतले अर्ध्या किमतीत

धावत आलो तुझ्याकडे आनंद ओसांडीत
वास घेऊन म्हणालीस टाक तो शिळा मातीत

प्रेम माझे खरे भेसळ असेल भेटीत कदाचित
यत्नांचे मोल शून्य अन नकार आला झोळीत

अर्ध्या किमतीने हरले प्रेम माझे शर्यतीत
हातात हवा होता, पण चंद्र राहिला गगनातीत