धक्का

Started by mkapale, July 26, 2023, 11:02:31 AM

Previous topic - Next topic

mkapale

धक्का

प्रतीक पत्रिकेचे देऊन गेलीस
पाणी नात्यावर तू सोडून गेलीस
का मला रिक्त , भग्न , करंटा करून गेलीस तू!

ओढणीत अडकून फ्रेम पडून गेली
सोबत हृदय माझे तोडून गेली
विसंगी विभाजित तुकड्यांत बदलून गेलीस तू!

पहिल्या विजेनंतर तू मला बिलगलेली
शेवटची वीज चित्त काळवंडून गेली
मती गोठली मन आसवांत वितळून गेलीस तू!

रंगात जगाया , गावया मला तू शिकवले
पाहून तुला त्यापुढे माझे मस्तक ते नमले
आज नास्तिक बेसूर रंगहीन करून गेलीस तू!

उपमा देतसे नाजूक फुलांची तुला
सुगंध तुझा वाटे मोगर्यागत मला
निर्मळ प्रेमाचं निर्माल्य मलाच वाहून गेलीस तू!

कळेना तुझ्यावर मरावे कि जगावे
आस जगण्याची पुन्हा जागली तुजसवे
तुजविण जगू कि मरू,संभ्रमात ठेऊन गेलीस तू!

साथ हा सात जन्माचा म्हणालीस तू
मरे तोवर काळजी घेणार होतीस तू
का दुसऱ्यासाठी माझा गळा घोटून गेलीस तू!