दिन-विशेष-लेख-राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन-C

Started by Atul Kaviraje, July 26, 2023, 04:53:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                           "राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन"
                          ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-26.07.2023-बुधवार आहे.  २६ जुलै-हा दिवस "राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

                 व्यसनांची लक्षणे--

वर्तणुकीत अचानक बदल घडतो.
अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या मुलांची शाळेत उपस्थिती कमी होऊ लागते.
अभ्यासात, खेळ किंवा अन्य कार्यक्रमात त्याचे मन लागत नाही.
पॉकेटमनी वाढविण्यासाठी सतत पालकांकडे तगादा.
घरातील वस्तू हळूहळू गायब होणे.
जुने मित्र सोडून नवीन मित्र बनविणे.
बाथरुममध्ये जास्त वेळ घालविणे.
घरात इंजेक्शन अथवा सिरिंज आढळणे.
डोळे लाल, निस्तेज होणे, डोळ्यांखाली सूज येणे.
बोलताना अडखळणे, उभे राहण्यासाठी त्रास होणे.
भूक न लागणे.
वजन कमी होणे.
व्यक्तिगत स्वच्छता, कपड्यांबद्दल बेफिकिरीने वागणे.
निद्रानाश
व्यसनाचा परिणाम फुप्फुस, स्मरणशक्ती, अवयव निकामी होणे, अस्वस्थता, मानसिक आजार वाढतात.

                  यावर उपाय--

पालकांनी आपल्या पाल्याला समजून घ्यावे.
त्याच्याशी मित्र म्हणून वागा.
काय वाईट..काय चांगले हे गोडीने व मित्रत्वाच्या नात्याने पटवून द्या.
त्याच्याशी प्रेमाने वागा...त्याला विश्वासात घ्या.
वाईट मित्रांची संगत करू देऊ नका.
वेळीच सावध करायला हवे.
शिक्षकांचे हुशार मुलांबरोबर कमी मार्क्स असलेल्या मुलाकडेही तितकेच लक्ष हवे.
कोणत्याही मुलाला कमी लेखू नका.
तसे झाले तर ते व्यसनाकडे वळली जातात.

                         औषधोपचार--

            मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन--

     शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून मद्य आणि अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना म्हणून स्वयंसेवी संघटनांना पुनर्वसन केंद्र चालवण्यासाठी अनुदान दिले जाते. व्यसनविरोधी शिबिरांचे आयोजन करणे, जनजागृती करणे, व्यसनाधीन युवकांचे पुनर्वसन करणे अशा उपाययोजनांसाठीही आर्थिक सहाय्य पुरवले जाते. शाळा-महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना अमली पदार्थाच्या घातक परिणांमाविषयी माहिती दिली जाते. शिवाय मुंबईत केईएम हॉस्पिटलनंतर आता राजावाडी हॉस्पिटलमध्येही अमली पदार्थ व्यसनाधीन झालेल्यांवर मोफत उपचार केले जातात.

                  तज्ज्ञ म्हणतात...

     डॉ. प्रसन्न खटावकर (मानसोपचार तज्ज्ञ, सोलापूर)- अमली पदार्थांचे सेवन हा एक मानसिक आजार आहे. याचे सेवन करणारे चटावलेले असतात. याचा वाईट परिणाम हा त्या व्यक्तिच्या आयुष्यावर तर होतोच, मात्र कुटुंब आणि समाजावरही होत असतो. सर्व व्यसनांवर निश्चित उपचार आहेत. अमली पदार्थांच्या विळख्यातून सहजपणे बाहेर येण्यासाठी योग्य तज्ज्ञ व योग्य कालावधीमध्ये उपचार व्हायला हवेत.

                 युवकांना सल्ला--

     अमली पदार्थ वेळेवर न मिळाल्याने किंवा महाग झाल्याने युवकांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत आहे. यात महाराष्ट्रातील युवकांचा क्रमांक वरचा आहे.

     आपले जीवन सुंदर आहे. ते एकदाच मिळत असते. अमली पदार्थांपासून दूर राहून आपले जीवन सुंदर बनवा. आरोग्याला महत्त्व द्या... व्यायाम करा...खेळ खेळा...पण अमली पदार्थांना थारा देऊ नका !

--धोंडिराम अर्जुन,
(माहिती स्रोत: महान्युज)
---------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.विकास पेडिया.इन)
                     ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.07.2023-बुधवार.
=========================================