३०-जुलै-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, July 30, 2023, 04:42:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०७.२०२३-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "३०-जुलै-दिनविशेष"
                                  -------------------

-: दिनविशेष :-
३० जुलै
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००१
राजस्थानातील अलवर येथील राजेंद्रसिंह यांना 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार' जाहीर. छोटे बंधारे बांधून पाणी साठवण्याबाबत त्यांनी लोकसहभागातून मोठे काम केले आहे.
२०००
कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्‍च न्यायालयाचा निकाल
२०००
चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.
१९९७
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 'राजीव गांधी राष्ट्रीय सद्‍भावना पुरस्कार' जाहीर
१९६२
'ट्रान्स कॅनडा हायवे' हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
१९३०
पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.
१८९८
विल्यम केलॉग याने 'कॉर्नफ्लेक्स' विकसित केले.
१६२९
इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० जण मृत्यूमुखी पडले.
७६२
खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९७३
सोनू निगम – पार्श्वगायक
१९४७
अर्नोल्ड श्वार्झनेगर – जन्माने ऑस्ट्रियन असलेले अमेरिकन शरीरसौष्ठवपटू, अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे ३८ वे राज्यपाल
१८६३
हेन्‍री फोर्ड – फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक
(मृत्यू: ७ एप्रिल १९४७)
१८५५
जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स – जर्मन उद्योगपती
(मृत्यू: १४ आक्टोबर १९१९)
१८१८
एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका
(मृत्यू: १९ डिसेंबर १८४८)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०११
डॉ. अशोक दामोदर रानडे
डॉ. अशोक दामोदर रानडे – संगीत समीक्षक
(जन्म: २५ नोव्हेंबर १९३७)
१९९५
डॉ. विनायक महादेव तथा 'वि. म.' दांडेकर – अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी' या संस्थेची त्यांनी उभारणी केली. त्यांचे 'पॉव्हर्टी इन इंडिया' हे पुस्तक बरेच गाजले.
(जन्म: ६ जुलै १९२०)
१९९४
शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि 'बालभारती'चे संपादक. त्यांचे 'चोरा मी वंदिले', 'सागराचे पाणी', 'सवाल', 'बाजिंदा' हे कथासंग्रह तसेच 'सरपंच', 'इशारा', 'घुंगरू', 'कुलवंती', 'बेईमान', 'ललाट रेषा', 'सुन माझी सावित्री' या कादंबर्‍या हे गाजलेले साहित्य आहे.
(जन्म: ८ ऑगस्ट १९२६)
१९८३
'कर्नाटकसिंह' गंगाधर बाळकृष्ण देशपांडे – स्वातंत्र्यसैनिक
(जन्म: ३१ मार्च १८७१)
१८९८
ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला चॅन्सेलर
(जन्म: १ एप्रिल १८१५)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.07.2023-रविवार.
=========================================