चिंब पावसातली कविता-गीत-पाऊस पडतोय, वर्षताहेत जल-धारा, मनाला माझ्या नाहीय किनारा

Started by Atul Kaviraje, August 01, 2023, 11:09:06 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, चिंब पावसातली एक वेगळीच, गूढ, विचार करावयास लागणारी कविता-गीत ऐकवितो. "बहता है मन कहीं, कहाँ जानती नहीं"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस जुलै महिन्याची ही मंगळवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( बहता है मन कहीं, कहाँ जानती नहीं )           
--------------------------------------------------

            "पाऊस पडतोय, वर्षताहेत जल-धारा, मनाला माझ्या नाहीय किनारा"
           -----------------------------------------------------------

पाऊस पडतोय, वर्षताहेत जल-धारा
मनाला माझ्या नाहीय किनारा
पाऊस मनाला वाहवत नेतोय,
कुणीकडे, कुठे, अजाणता, बेसहारा

पाऊस पडतोय, वर्षताहेत जल-धारा
मनाला माझ्या नाहीय किनारा
थांबता थांबतच नाहीय ते,
वाहवीत अथक प्रवासाची धुरा

मनाला कुणी जIणू शकेल का ?
मन कुणी कधी पाहिलेय का ?
त्या प्रशांत खोल खोल सागरासम,
मनाचा ठाव कधी लागेल का ?

मनाने जणू पंख ल्यालेत
स्वैर, मुक्त ते बागडू लागलेय
माझ्याहीपुढे ते धावू लागलेय,
अचपळ, चंचल, अबलख झालेय

या पावसाची किमया का ही ?
ज्याने मनाला बोलते केलेय
निशब्द, निमग्न, निःसंग, निर्विवाद,
मनातल्या भावनांना वाहते केलेय

सवे थंड वाऱ्याचा झोका आदळत
माझ्या मना हलकेच झुलवतोय
धुंद फुंद माझ्या मना हेलकावत,
पिसाट पवन हिंदोळा देतोय

हा पाऊस माझं मन भिजवून गेला
हा वाराही माझं मन उडवून गेला
माझ्या मनाला काबूत ठेवता ठेवता,
सवे मलाही तो बहकवून गेला

पावसाच्या जलधारांत मन स्वच्छंद नहIतंय
या ओल्या ऋतूत ते बाल्यापरी भिजतंय
आज त्याला थांबवणं अशक्य आहे,
ते खेळतंय, बागडतंय, धावतंय, दडतंय   

फक्त पाऊसच आहे याला जबाबदार
तोच मनाला बहकत ठेवतोय
मनाचा किनारा सापडता, शोधता,   
अवचित माझ्यापासून दूर जातोय

लाटांवर मुक्त रेंगाळणारं मन
प्रवाहात हिंदकळणारं झुलणारं मन
अजूनही ते अंतिम किनारा शोधतंय,
या जलधारांत ते निवारा शोधतंय

दरवर्षी हे असंच घडतंय
पर्जन्य धारातही ते अथक धावतंय
नाहीय मनास अंत, नाहीय थारा,
त्याच धुंदीत ते एक सहारा शोधतंय

पाऊस पडतोय, वर्षताहेत जल-धारा
मनाला माझ्या नाहीय किनारा
जणू पुसला गेलाय तो दृष्टिपटलातून,
पुढे अस्पष्ट धुक्याचा पटल गहिरा 

पाऊस पडतोय, वर्षताहेत जल-धारा
मनाला माझ्या नाहीय किनारा
असंच भटकत राहील ते कुठवर ?,
आजही दूर राहिलाय तो किनारा

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.08.2023-मंगळवार.
=========================================