प्रश्न

Started by mkapale, August 07, 2023, 09:04:14 AM

Previous topic - Next topic

mkapale

प्रश्न

जरा कुठे सावरलो होतो
जग म्हणाले तोल गेला माझा
आलीस वावटळापरी तू
स्थिरतेस कंप भासला तुझा

भोवती सारे तरी अधुरा मी
होतो येण्याआधी तुझ्या
गैर भासे जे जगाला ,तेच
योग्य वाटे मनास माझ्या

जाब घेणारे होते कुठे
डोळ्यात होते प्रश्न तेव्हा
उत्तरांची कळी खुलतांना
थांबव सारे म्हणाले जेव्हा

हिंदोळे मन घेत होते
मनमुराद तो होता झोका
आनंद पसरला असता चहूकडे
का दिसे इतरांना धोका

संसार अन वयाच्या चौकटीत
थिजून जावे कि भिजावे
तोडून पाश , ऐकून मनाचे
का मनापासून न जगावे

छंद होता तोवर, वाहवा होती
करावे काम हेच रोज , तर चिंता
धन नाही ह्यात हि जोखीम आहे
छंद जोपासावे असे जसा जोडधंदा

रोजची नोकरी कि छंद,प्रश्न हा
मी लेखक, कल्पना हि ,विचारी मना
काय स्थिर अन काय अस्थिर
चित्त कि हृदय विचारू कोणा