दिन-विशेष-लेख-आंतरराष्ट्रीय भूमिपूत्र दिन-A

Started by Atul Kaviraje, August 09, 2023, 04:56:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                              "आंतरराष्ट्रीय भूमिपूत्र दिन"
                             ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक- 09.08.2023-बुधवार आहे.  ९ ऑगस्ट-हा दिवस "आंतरराष्ट्रीय भूमिपूत्र दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

           भूमिपुत्र आरक्षण आंध्र प्रदेशात मंजूर, महाराष्ट्रात काय स्थिती?--

     आंध्रप्रदेश सरकारने खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना 75 टक्के आरक्षण देण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट्रात वेळोवेळी स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्य देण्यात यावं, अशी मागणी केली जात असते. त्या मागण्यांचं काय होतं?

     आंध्रप्रदेशच्या जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने Employment of Local Candidate in Industries / Factories Act 2019 सोमवारी विधानसभेत मंजूर करून घेतला.

     याअंतर्गत आंध्रप्रदेशातले सर्व प्रकारचे उद्योग, कारखाने कंपन्या आणि शासन-जनता भागीदारीतले मोठे प्रकल्प यांच्यामध्ये 75 टक्के भूमिपुत्र आरक्षण लागू असेल.

     या उद्योगांसाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर त्यांना प्रशिक्षित करून कामावर घेण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे.

     सरकारने एखाद्या उद्योगाला आर्थिक अथवा जमिनी देऊन मदत केलेली असो किंवा नसो, त्यांना स्थानिक भूमिपुत्रांसाठी 75 टक्के आरक्षण देणं बंधनकारक आहे. तसंच या कंपन्यांना दर तीन महिन्यांच्या अंतराने स्थानिकांना दिलेल्या रोजगाराबाबतचा अहवाल संबंधित सरकारी अधिकाऱ्याला द्यावा लागणार आहे.

     कायदा करून अशा प्रकारचं आरक्षण देणारं आंध्र प्रदेश हे देशातलं पहिलंच राज्य ठरलं आहे. याआधी मध्य प्रदेश सरकारने भूमिपुत्रांना 70 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र त्या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही.

     महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गुजरात या राज्यांमध्येही नोकऱ्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना देण्याची मागणी वारंवार होत असते.

     आंध्र प्रदेशने याबाबत निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्रात याबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

     महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतल्यास त्याचं स्वागत करू, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे.

--प्राजक्ता पोळ आणि हर्षल आकुडे
--बीबीसी मराठी प्रतिनिधी
------------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-bbc.कॉम)
                      ------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.08.2023-बुधवार.
=========================================