दिन-विशेष-लेख-भारतीय ग्रंथालय दिन-A

Started by Atul Kaviraje, August 09, 2023, 05:00:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                 "भारतीय ग्रंथालय दिन"
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-09.08.2023-बुधवार आहे.  ९ ऑगस्ट-हा दिवस "भारतीय ग्रंथालय दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     १२ ऑगस्ट हा दिवस भारतात ग्रंथपालनशास्त्राची मुहूर्तमेढ रोवणारे डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिन. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस ग्रंथालय दिन म्हणून साजरा केला जातो.

               राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने...

     भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त (12 ऑगस्ट) राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने वाचनसंस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वृध्दींगत व्हावी यासाठी ग्रंथालयाचे असलेले महत्व आणि डॉ.रंगनाथन यांचे कार्य याविषयी घेतलेला आढावा...

     ग्रंथालयशास्त्राचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा केला जातो. ग्रंथालयांचा विकासात डॉ.शियाली रामामृत रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ.रंगनाथन यांची रूजवला. नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य झिजवले.

     सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, याचे महत्त्व डॉ.रंगनाथन यांनी सर्वप्रथम पटवून दिले. त्याकरिता ग्रंथालयांचा विकास, प्रसार होऊन देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची दारे विनामूल्य खुली करून द्यायला हवी, यासोबत वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी जनतेला प्रवृत्त केले पाहिजे, हा विचार डॉ.रंगनाथन यांनीच देशात रुजविला.

     शिक्षण मिळविणे सोपे आहे, पण शिक्षण देणे हे एक शास्त्र आहे, हे लक्षात आल्यानंतर त्या शास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवून अध्यापन शास्त्राची 'एल. टी.'परीक्षा उत्तीर्ण केली आणि गणिताचे प्राध्यापक झाले. नंतर एक गणिततज्ज्ञाने आपली प्राध्यापकाची नोकरी सोडून ग्रंथपाल झाला. मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम पाहिले. ग्रंथालय शास्त्राच्या शिक्षणाकरिता मद्रास विद्यापीठाने आपल्या स्वखर्चाने त्यांना 'स्कूल ऑफ लायब्ररीयनशिप'साठी लंडनला पाठविले होते. लंडन विद्यापीठाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते पुन्हा मायदेशी परतले. सार्वजनिक ग्रंथालयाची गरज ओळखून 30 जानेवारी 1928 रोजी त्यांनी 'मद्रास ग्रंथालय संघाची' स्थापना केली.

--लेखिका: वर्षा फडके
--माहिती स्रोत: महान्युज
----------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.विकासपीडिया.इन)
                  ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.08.2023-बुधवार.
=========================================