दिन-विशेष-लेख-जागतिक आदिवासी दिन-A

Started by Atul Kaviraje, August 09, 2023, 05:06:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                  "दिन-विशेष-लेख"
                              "जागतिक आदिवासी दिन"
                             ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक- 09.08.2023-बुधवार आहे. ९ ऑगस्ट-हा दिवस "जागतिक आदिवासी दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     आज 9 ऑगस्ट हा दिवस सर्विकड जागतीक आदिवासी दिवस म्हणून साजरा करतात. या दिवसी सर्व जण आदिवासी बांधव एकत्र येतात आणि आपल्या आपल्या संस्कृती प्रमाणे वेशभूषा घालतात, गाणे आणि नृत्य करून हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात. मानवाची जसजशी उत्क्रांती होत गेली तसतसा मानव पृथ्वीवर निरनिराळ्या खंडापर्यंत प्रवास करू लागला.

     आदिवासी दिन: नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण जागतीक आदिवासी दिवस या बद्दल निबंध, भाषण आणि सूत्रसंचालन कस  करायच ते बघणार आहोत.

                 ➡️९ ऑगस्ट क्रांती दिन भाषण--

जंगलाचा मी रहिवासी
नातं माझं निसर्गाशी,
झाडे, वेली, पशू-पक्षी सारे
आहेत माझे मित्र खरे,
मंजुळ पावरी वाजे
आम्ही आहोत जंगलाचे राजे !!

     नमस्कार मित्रांनो, आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. सर्वप्रथम माझ्याकडुन  सर्व आदिवासी बांधवांना जागतीक आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

                           ➡️स्वातंत्र्य दिवस भाषण--

                 ➡️स्वातंत्र्य दिवस सूत्रसंचालन--

     मित्रांनो, संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेस 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या असे लक्षात आले की 21व्या शतकात म्हणजेच तंत्रज्ञानाच्या, संगणकाच्या युगात सुद्धा जगातील वेगवेगळ्या देशांमधील आदिवासी समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे. गरिबी, अज्ञान, आरोग्य सुविधांचा अभाव, बेरोजगारी, मजुरी अशा अनेक समस्यांनी हा समाज ग्रासलेला आहे.त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी 1994 पासून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून संपूर्ण जगभरात हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

     मित्रांनो आदिवासी या शब्दांमधील आदि म्हणजे खूप आधीपासून आणि वासी म्हणजे वास्तव्य करणारे. खूप आधीपासून, पूर्वीपासून वास्तव्य करणारे लोक म्हणजेच आदिवासी होय.आदिवासींना निसर्गा विषयी खूप आवड असते.आदिवासी लोक निसर्गाची पूजा करतात. निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते देवता मानतात. निसर्गावर त्यांची निस्सिम श्रद्धा असते. जंगलामधून कंदमुळे, फळे, तंतू, मध, औषधी वनस्पती गोळा करणे, लाकूड कटाई करणे हे आदिवासी लोकांचे मुख्य व्यवसाय आहेत.

     आदिवासी लोकांच्या बोलीभाषा देखील विविध प्रकारच्या असतात. कोरकू, कोलामी, गोंडी, गोरमाटी, वाघरी, सावरा, पावरी अशा अनेक बोलीभाषा आदिवासी लोक बोलतात. यातील बहुतेक भाषांना लिपी नाहीत. त्यामुळे या भाषा जपल्या गेल्या पाहिजेत. प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र अशी पंचायत असते.

     आदिवासी समाजामध्ये परंपरेला खूप महत्त्व आहे. आपल्या परंपरेचा ठेवा एक पिढी दुसऱ्या पिढीला कथा, गाणी, नृत्य इत्यादी माध्यमातून देते. आदिवासी लोकांची लोककला, चित्रकला, गायन, वादन, नृत्यकला, शिल्पकला अतुलनीय अशा असतात. कोकणातील वारली जमातीची वारली चित्रकला आपणा सर्वांना माहिती असेलच. किती अप्रतिम आहे ती चित्रकला.

     महाराष्ट्रामध्ये मल्हार कोळी, महादेव कोळी, वारली, कोकणा, कातकरी, ठाकूर, पावरा, गावित, भिल्ल, कोरकू अशा अनेक आदिवासी जमाती आढळतात. या जमाती ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या पाहायला मिळतात.आदिवासी समाज आज प्रगती करत आहे.विविध क्षेत्रांमध्ये आदिवासी समाज महत्त्वाचे योगदान देत आहे. अगदी पूर्वीपासून बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या भिल्ल, किल्लेदार खेमाजी रगतवान, समशेर सिंग पारधी अशा अनेकांनी आपल्या पराक्रमाने आदिवासी समाजाची मान उंचावली आहे.आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती या एक आदिवासी महिलाच आहेत.ही आपल्या सर्वांसाठी एक गौरवाची गोष्ट आहे.

शेवटी इतकंच म्हणावसं वाटतं,
जंगल राखले तुम्ही, परंपरा जपल्या तुम्ही
निसर्ग देवतेचं देवपण, श्रध्देने जपलं तुम्ही
म्हणूनच सर्व आदिवासींचा
सन्मान करतो आम्ही |

          जय आदिवासी.............

--Yogesh more
-----------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी दुनिया.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.08.2023-बुधवार.
=========================================