ढगांची कविता-अरे मेघा, तुला कुणाची आठवण आली, धरेवर जलाची तू अगणित वर्षा केली

Started by Atul Kaviraje, August 13, 2023, 11:23:08 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पाऊस बरसवणाऱ्या ढगांची एक विरह कविता-गीत ऐकवितो. "मेघा रे मेघा, तेरा मन तरसा रे,पानी क्यों बरसे रे"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही नुकताच पाऊस शिवरुन गेलेली आणि हिरवीगार झालेली रविवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( मेघा रे मेघा, तेरा मन तरसा रे,पानी क्यों बरसे रे )           
-----------------------------------------------------------

     "अरे मेघा, तुला कुणाची आठवण आली, धरेवर जलाची तू अगणित वर्षा केली"
    -------------------------------------------------------------------

अरे मेघा, तुला कुणाची आठवण आली
धरेवर जलाची तू अगणित वर्षा केली
एवढा का तरसतोस तू, एवढा का बरसतोस तू ?,
तुझी अखंड संततधार नदी सागराला जाऊन मिळाली

अरे मेघा, तुला कुणाची आठवण आली
धरेवर जलाची तू अगणित वर्षा केली
तुलाही कुणी प्रिय आहे का इथे धरेवर ?,
सतत बरसून तू त्यास प्रेमाची पावती दिली

अगदी तुझ्यासारखेच हाल आहेत बघ, माझे इथे
द्विधा मनःस्थितीत आहे माझे मन, धाव घेतय इथे तिथे
प्रियाची हृद्य आठवण येतेय मज, तुला पाहून रे ढगा,
आता थोडं सहन कर, माझ्यासारखा तूही रहा थोडं उगा

इतका नकोस बरसू, इतका तू नकोस तरसू
इतका नकोस वर्षू, इतके नकोस वाहवू माझ्यासम आसू
माझ्या प्रियाला आहे का माझी पर्वा, माझी काळजी,
त्याला कळतेय का माझे दुःख, माझ्या मनाची नाराजी

निरंतर अश्रू वाहताहेत माझे, तुला कळतंय सारं ना
माझे दुःख आपलेसे करून तूही बरसतोयस ना
तू थोडा वेळ बरसशील, आणि तुझे दुःखही नंतर विसरशील,
पण माझं काय, प्रियाची याद मला सतत येतच राहील

प्रियाविण पहा माझे मन कसं उदास झालय, रे मेघा
अन्नही नाही लागत गोड, तहानही हरपलीय माझी, रे जलदा
आता तूच सांग यावर काय उपाय, यावर काय इलाज ?,
आता तूच माझा हो मार्गदर्शक, माझा झालाय आज नाईलाज 

आता तूच माझा देव, तूच आहेस माझा ईश्वर
धरेला पाण्याची संजीवनी देणारा, तूच खरा परमेश्वर
माझीही तृष्णा भIगवं, मलाही दे तू तुझं अमृत-जल,
प्रियाची माझ्या भेट घडव, दुःखी आहे माझं दिल

अरे मेघा, तुला कुणाची आठवण आली
धरेवर जलाची तू अगणित वर्षा केली
जणू बरसून महापुरच आणलास तू या पृथ्वीवर,
नदी ओढे भरून लागले वाहू, सागरासही आलाय भर   

अरे मेघा, तुला कुणाची आठवण आली
धरेवर जलाची तू अगणित वर्षा केली
थोडासा थांब, तुझं दुःखही मला जरा सांग,
नाही लागत आहे मला तुझ्या मनाचा ठाव, अथांग

बागाही मला साऱ्या ओस भासू लागल्यात, फुलेही जणू बावलीत
मध नाहीय फुलांमध्ये, मधमाश्याही मधाविना उपाशी राहू लागल्यात
पाऊस बहार आणतोय, पण माझ्या मनाचा मोहरच गळून पडलाय,
प्रियाविण सारं सारं निर्जीव, रसहीन, उदास, निराश वाटून राहिलय

रे मेघा, वर्षता वर्षता तू त्याची खबर घे जरा
माझा सांगावा धIड त्याला, माझ्या मनाला नाहीय थारा
जोवर सजणाची नाही होत भेट, तोवर जीवाला लागतोय घोर,
तुझ्या पर्जन्यानेही नाचत नाहीय माझ्या मनाचा मोर

आता माझे जीवन मरण आहे तुझ्याच हाती, रे मेघा
माझ्या प्रियकराला मला भेटवं, माझे जीवन तू घडवं
तुझे जल मी प्राशिते, माझ्या दुःखाला तू पिऊन टाक,
या वर्षणाऱ्या जलधारांत ऐकू जातेय ना तुला माझी हाक ?

कर माझ्यावर एक एहसान, दे मला माझ्या प्रियकराचे दान
आता तुही रडू नकोस, अन मलाही अधिक रडवू नकोस
तुझे अमूल्य थेम्ब बरसवून, माझी तहान तृप्त कर,
माझे प्रेम मला दे मिळवून, ऋणी राहीन मी तुझी आयुष्यभर

अरे मेघा, तुला कुणाची आठवण आली
धरेवर जलाची तू अगणित वर्षा केली
माझ्या प्रियकराचीही मला खूप येतेय आठवण,
आता तूच माझा पाठीराखा, कर माझी पाठ-राखण

अरे मेघा, तुला कुणाची आठवण आली
धरेवर जलाची तू अगणित वर्षा केली
मला माझं नवीन आयुष्य तू पुन्हा मिळवून दे,
डोळे भरून तुला बरसताना मला पुन्हा पुन्हा पाहू दे

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.08.2023-रविवार.
=========================================