१३-ऑगस्ट-दिनविशेष-A

Started by Atul Kaviraje, August 13, 2023, 06:00:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१३.०८.२०२३-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                "१३-ऑगस्ट-दिनविशेष"
                                ---------------------

-: दिनविशेष :-
१३ ऑगस्ट
आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००४
ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. सुमारे ३०० दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन अंदाजे ४ अब्ज लोकांनी हा उद्‍घाटन सोहळा पाहिला.
१९९१
कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
१९६१
आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने आपल्या सीमा बंद केल्या. बर्लिनची भिंत बांधण्यास सुरूवात झाली.
१९५४
रेडिओ पाकिस्तान वरुन 'कौमी तराना' हे पाकिस्तानचे राष्ट्रगीत प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले.
१८९८
कार्ल गुस्ताव्ह विट याने 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.
१६४२
क्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९८३
संदीपन चंदा
संदीपन चंदा – भारताचा ९ वा ग्रँडमास्टर (२००३), ओपन डच चेस चॅम्पियनशिप विजेता (२०१६, २०१७), चेस ऑलीम्पियाड मध्ये भारताचे प्रतिनिधित्व (२००४, २००६, २००८), सर्वोच्च फिडे मानांकन २६५६ (मे २०११)
१९३६
वैजयंतीमाला बाली ऊर्फ 'वैजयंतीमाला' – चित्रपट अभिनेत्री
१९२६
फिडेल कॅस्ट्रो – क्यूबाचे १५ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१६)
१९०६
विश्राम बेडेकर
विश्वनाथ चिंतामणी तथा विश्राम बेडेकर – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक व दिग्दर्शक. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली, एक भारतीय तरुण आणि एक जर्मन वंशाची ज्यू तरुणी यांची अदभुतरम्य प्रेमकथा सांगणारी 'रणांगण' ही त्यांची एकमेव कादंबरी ही मराठी साहित्यातील मानदंड समजली जाते. मुंबई येथे १९८८ मध्ये झालेल्या ६० व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
(मृत्यू: ३० आक्टोबर १९९८)
१८९९
सर अल्फ्रेड हिचकॉक – चित्रपट दिग्दर्शक
(मृत्यू: २९ एप्रिल १९८०
१८९८
प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे – लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते
(मृत्यू: १३ जून १९६९)
१८९०
त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा 'बालकवी' – १९०७ साली जळगाव येथे भरलेल्या पहिल्या कविसंमेलनात वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी केलेल्या कवितावाचनाने प्रभावित होऊन संमेलनाचे अध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना 'बालकवी' ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला.
(मृत्यू: ५ मे १९१८)
१८८८
जॉन लोगे बेअर्ड – स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी (Television) चे संशोधक
(मृत्यू: १४ जून १९४६)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.08.2023-रविवार.
=========================================