मुसळधार पावसाची कविता-ढग गडगडताहेत, वीज कडकडतेय, या पावसाने मनी काय योजलंय ?

Started by Atul Kaviraje, August 14, 2023, 10:37:08 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, मुसळधार पावसाची एक कविता ऐकवितो. "बादल यूँ गरजता है, डर कुछ ऐसा लगता है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही पाऊस नसलेली व चमकदार ऊन पडलेली सोमवार-सकाळ                             आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( बादल यूँ गरजता है, डर कुछ ऐसा लगता है )           
--------------------------------------------------------

         "ढग गडगडताहेत, वीज कडकडतेय, या पावसाने मनी काय योजलंय ?"
        --------------------------------------------------------------

ढग गडगडताहेत, वीज कडकडतेय
या पावसाने मनी काय योजलंय ?
असा पाऊस कधीही पाहिला नव्हता, यापूर्वी,
मग आताच तो इतका का गरजतोय आणि बरसतोय ?

ढग गडगडताहेत, वीज कडकडतेय
या पावसाने मनी काय योजलंय ?
मनात एक अगम्य भीती तो निर्माण करतोय,
कुठल्या संकटाची नांदी तर नाही, मनाला प्रश्न जाचतोय

क्रुद्ध ढग वर आभाळी एकमेकांवर धडाम आपटताहेत
शत्रूसम त्यांचे वर्तन, एकमेकांवर जणू चालून जाताहेत
मध्येच त्यातून निसटलेली विद्युलता धरेवर धावI बोलतेय,
छातीत धडकी भरायला एवढेच कारण पुरेसे ठरतेय

ही कोणती रीत रे पावसा तुझ्या पडण्याची
मुसळधार कोसळत अंगावर काटा उभा करण्याची
आज काय झालय काय तुला, काही बिघडलय का ?,
तुझ्या काय आहे मनात, तुझ्याबरोबर काही घडलय का ?

इथे माझ्याही मनी एका वादळाने जन्म घेतलाय
भिरभिरत, घुमत तो साऱ्या देहभर घुमू लागलाय
सांग कसा हा शीश महाल सुरक्षित राहू शकेल ?,
दोन्हीही वादळात त्याचा टिकाव कसा बरं लागू शकेल ?

हे तुफान कधी शमेल त्याचा काही थांग नाही
मनातले वादळ कधी थामेल त्याचा काहीहि नेम नाही 
अशात हे धडकते नाजूक दिल, त्याने काय करावं बरं ?,
ते कितपत पुरेस ठरेल हे संकट झेलण्यास, सांग बरं ?

ढग गडगडताहेत, वीज कडकडतेय
या पावसाने मनी काय योजलंय ?
आम्ही प्रेमी जनानी कुठे जावं अशा परिस्थितीत,
या आमच्या जिवलग मित्राने आमच्याशी वैर का पत्करलंय ?

ढग गडगडताहेत, वीज कडकडतेय
या पावसाने मनी काय योजलंय ?
केव्हातरी तुझ्याच साक्षीने आमचे जमले होते प्रेम,
मग आताच का तुला ते आक्षेपार्ह ठरलंय ?

ही खुळी सांजही तुफानाने विचलित झाली आहे
या पावसाने जळाऐवजी जणू आगच बरसवली आहे
तिन्ही त्रिकाळ हा पाऊस बस फक्त झोडपू लागलाय,
कशाचीही पर्वा न करता नुसता मुसळधार पडू लागलाय

अघटित असं काहीतरी घडू पाहत आहे, घडत आहे
निसर्ग नियमाच्या विरुद्ध असं काहीतरी अटळ होत आहे
जलजला, कयामत तर नाही ना येणार फिरून पुन्हा ?,
मन घाबरत आहे, भयाने व्याप्त आहे, साशंक आहे

आता तर माझा धीर सुटत चालला आहे
वर अंबरी पावसाचा तोल बिघडला आहे
आज निसर्ग का चिडलाय आम्हा मानवावर ?,
कोणती शिक्षा तो आमच्या चुकांना देत आहे ?

ढग गडगडताहेत, वीज कडकडतेय
या पावसाने मनी काय योजलंय ?
याची परिणती काय कोणास ठाऊक, माहित नाही,
ही विपरीत घडी पाहण्यात कधी आलीच नाही

ढग गडगडताहेत, वीज कडकडतेय
या पावसाने मनी काय योजलंय ?
आभाळ नुसतं झाकोळलंय, कृष्णमेघांच्या काळ्या सावलीने,
दृष्टीपथात असणार क्षितिजही एकाएकी विलुप्त झालय

निसर्गाचे हे रौद्र रूप जणू तांडव करीत आहे
शंकराचा तिसरा डोळा जणू आगच बरसवीत आहे
यापुढे कुणाचाही नाही टिकाव, नाही कुणाचाही तग,
निसर्ग पाहतI पाहतI रूप बदलतोय, आणि अगणित रंग

या पावसानेच असं ताडलं, तर आमचा त्राता कोण ?
या पावसानेच असं झोडलं, तर आमचा रक्षणकर्ता कोण ?
आता पुरे कर पावसा, सहनशक्तीच्या बाहेर आहे सारं,
आता आणि परीक्षा पाहू नकोस, तुझं कोसळणं जIचतय फार

हा मानव फारच थिटा आहे तुझ्या शक्तीपुढे
हा माणूस काहीच नाही तुझ्या विशाल, विकराल रुपापुढे
आता तुझा क्षोभ, प्रक्षोभ मागे घे, शांत हो, संयमित हो,
तुझा वरदहस्त आम्हावर नेहमीच राहो, आता प्रसन्न हो

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.08.2023-सोमवार.
=========================================