दिन-विशेष-लेख-पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन-A

Started by Atul Kaviraje, August 14, 2023, 05:08:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                             "पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन"
                            -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक- 14.08.2023-सोमवार आहे.  १४ ऑगस्ट-हा दिवस "पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारताचे तुकडे होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. ब्रिटिश लॉर्ड माउंटबॅटन यांनी 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला. त्यामुळे पाकिस्तानात स्वातंत्र्याचा उत्सव 14 ऑगस्टलाच साजरा केला जातो. पण भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार भारत आणि पाकिस्तान एकाच दिवशी स्वतंत्र झाले.

     भारत-पाकिस्तान स्वातंत्र्याची कहाणी : पाकिस्तानला खरंच भारताच्या एक दिवस आधी स्वातंत्र्य मिळालंय?--

     भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळून 73 वर्षं पूर्ण झाली. पण, इंग्रजांबरोबरचा स्वातंत्र्य करार एकाचवेळी होऊन सुद्धा पाकिस्तान आपला स्वातंत्र्य दिन भारतापेक्षा एक दिवस आधी म्हणजे 14 ऑगस्टला का साजरा करतो? इतिहासातील अशा काही घटना पाहूया ज्यांच्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत.

     याविषयी पाकिस्तानमधले जुने जाणकार असं सांगतात की, "पाकिस्तानला पवित्र रमजान महिन्याच्या 27व्या मध्यरात्री स्वातंत्र्य मिळालं. आणि ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं तो दिवस अलविदा जुम्मा म्हणजे रमजान महिन्याचा शेवटचा शुक्रवार होता. आणि त्या दिवशी 14 ऑगस्ट 1947 हा दिवस होता. म्हणून पाकिस्तान स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताच्या एक दिवस पुढे किंवा 'मोठा' आहे."

     पण, आपण जर दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर बघितलं तर लक्षात येतं की, त्या दिवशी गुरुवार होता. आणि रमजानचा 27वा नाही तर 26वा दिवस होता.

     पाकिस्तानचं एक टपाल तिकीट बघितलं जे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 11 महिन्यांनी म्हणजे 9 जुलै 1948ला काढण्यात आलं, त्यात पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट 1947 असा स्पष्टपणे लिहिलाय.

     यातून हाच निष्कर्ष निघतो की, पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस 14 नाही तर 15 ऑगस्ट 1947 आहे. मग, स्वातंत्र्याचा पहिला वाढदिवस 14 ऑगस्ट 1948ला का साजरा झाला?

15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 दरम्यान भारतात काय काय झालं?
भारताचा राष्ट्रध्वज कसा जन्माला आला?
मग पुन्हा मनात गोंधळ निर्माण होतो की, पाकिस्तान खरंच कधी स्वतंत्र झाला? 14 ऑगस्ट 1947 की 15 ऑगस्ट 1947?

--अकील अब्बास जाफरी
--इतिहासकार, संशोधक
----------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-bbc.कॉम)
                       ------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.08.2023-सोमवार.
=========================================