दिन-विशेष-लेख-पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन-B

Started by Atul Kaviraje, August 14, 2023, 05:10:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                  "दिन-विशेष-लेख"
                             "पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन"
                            -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक- 14.08.2023-सोमवार आहे.  १४ ऑगस्ट-हा दिवस "पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     पाकिस्तान 14 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला असेल तर स्वातंत्र्याच्या 11 महिन्यांनंतर निघालेल्या टपाल तिकिटावर 15 ऑगस्ट 1947 अशी तारीख का लिहिलीय. आणि जर 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं असेल तर 1948 मध्ये स्वातंत्र्याची पहिली वर्षपूर्ती 14 ऑगस्टला का साजरी झाली. आणि तिथून पुढे पाकिस्तानात स्वातंत्र्यदिन 14 ऑगस्टला का साजरा होतो?

             पाकिस्तान खरा कधी स्वतंत्र झाला?--

     हे पडताळण्याचा सगळ्यांत पक्का दस्तऐवज म्हणजे इंडियन इन्डिपेन्डन्ट अॅक्ट 1947 (Indian Independent Act 1947). हा कायदा ब्रिटिश संसदेत मंजूर झाला. आणि ग्रेट ब्रिटनच्या सहाव्या राजाने 18 जुलै 1947 रोजी त्यावर स्वाक्षरी केली.

     या कायद्याची एक प्रत पाकिस्तानचे सेक्रेटरी जनरल चौधरी महम्मद अली (हे पुढे जाऊन पाकिस्तानचे पंतप्रधानही झाले) यांनी 24 जुलै 1947 लाच मोहम्मद अली जिन्ना यांना पाकिस्तानला पाठवून दिली होती.

              पाकिस्तानी झेंडा--

     15 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान सरकारच्या प्रतिनिधीमंडळाने लंडनच्या लँकेस्टर हाऊसमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांना झेंडा भेट दिला होता.

     हा कायद्याचा मजकूर ब्रिटिश सरकारने 1983मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'द ट्रान्सफर ऑफ पॉवर' या ग्रंथाच्या 12व्या खंडात 234व्या पानावर आहे.

     त्याचा अनुवाद कायद-ए-आझम पेपर्स प्रोजेक्ट, कॅबिनेट डिव्हिजन, पाकिस्तान सरकार, इस्लामाबाद यांनी केलेल्या जिन्ना पेपर्स (अनुवाद उर्दूत आहे) या ग्रंथाच्या तिसऱ्या खंडाच्या 45व्या पानावर आहे.

     या ग्रंथात सरळ सरळ असं म्हटलंय की, 15 ऑगस्ट 1947ला ब्रिटिश सरकार भारत आणि पाकिस्तान अशा दोन देशांची निर्मिती करेल.

     नवीन दोन देश भारत आणि पाकिस्तान हे असतील आणि त्यासाठी ठरलेली तारीख 15 ऑगस्ट आहे, असं त्यात नमूद करण्यात आलंय.

--अकील अब्बास जाफरी
--इतिहासकार, संशोधक
----------------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-bbc.कॉम)
                        ------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.08.2023-सोमवार.
=========================================