भारताचा स्वातंत्र्य दिवस-निबंध-1

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 10:52:54 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया एक निबंध.

     या वर्षी आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे अमृत महोत्सव म्हणून साजरी करत आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात हा दिवस साजरा केला जाईल. स्वातंत्र्य दिनाचा निबंध कसा लिहावा याविषयीच आपण आज पाहणार आहोत.

     15th August Speech In Marathi: 15 ऑगस्ट (15th August) 1947 हा दिवस भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस होता. स्वातंत्र्य सैनिकांनी सर्वस्वाचा त्याग करून आपल्या देशाला स्वातंत्र्य ( Independence day Speech In Marathi ) मिळवून दिले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, भारतीयांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या (Pandit jawaharlal nehru) रूपाने आपला पहिला पंतप्रधान निवडला, ज्यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील (Delhi) लाल किल्ल्यावर प्रथमच तिरंगा ध्वज फडकवला. प्रत्येक भारतीय हा खास दिवस एखाद्या सणासारखा साजरा करतो. तुम्ही शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेत असला तर याविषयावर 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनावर भाषण द्यायचं असेल किंवा तुम्हाला निबंध लिहायचा असेल तर तुमच्यायासाठी आम्ही काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलो आहे. त्या तुम्ही फॉलो करू शकतात.

               प्रस्तावना--

     15 ऑगस्ट 1947 ही तारीख आपल्या इतिहासात सूवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर एके दिवशी इंग्रजांना भारत सोडून जावे लागले. दोनशे वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं तर तो उत्सवही तितकाच मोठा व्हायला हवा होता आणि कदाचित त्यामुळेच आपण आजही तितक्याच थाटामाटात हा दिवस साजरा करतो.

               महत्त्व--

     या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. या दिवसाची आठवण येताच शहीदांप्रती आपले मस्तक आदराने झुकते. या सैनिकांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली होती. यामुळे आफण आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षम करावे हे आपले कर्तव्य आहे. देशाचे नाव जगात उंचावले पाहिजे असे आपल्याला वाटले पाहिजे.

              स्वातंत्र्य गाथा--

     इंग्रजांचे अत्याचार आणि अमानुष प्रथांना कंटाळून भारतीय जनता एकवटली आणि त्यातून सुटका करण्याचा निर्धार केला. सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांनी क्रांतीची आग पसरवली आणि प्राणांची आहुती दिली. 1947 चा दिवस आपल्यासाठी 'सुवर्ण दिवस' ठरला. आपण आणि आपला देश स्वतंत्र झाला.

     त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल, गांधीजी, नेहरूजी सत्य, अहिंसेसाठी आणि शस्त्राशिवाय लढले. सत्याग्रह आंदोलन केले, लाठ्या खाल्ल्या, अनेकवेळा तुरुंगात गेले आणि इंग्रजांना आपला देश सोडण्यास भाग पाडले. याप्रमाणे 15 ऑगस्ट 1947 पासून आपण हा दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करत आहोत. या दिवशी सर्व शाळा, सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज फडकावला जातो, राष्ट्रगीत गायले जाते आणि या सर्व महापुरुषांना, हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाते.

     राजधानी दिल्लीत आपले पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात. येथे हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. पंतप्रधान देशाला संदेश देतात. अनेक सभा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

            स्वातंत्र्याचा उत्सव (Celebration Freedom)--

     आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या आणि जनतेच्या अथक परिश्रमानंतर आणि बलिदानानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला ब्रिटिशांच्या जुलमी आणि गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले, तेव्हापासून आपण हा ऐतिहासिक दिवस स्वातंत्र्याचा सण म्हणून साजरा करतो. स्वातंत्र्याचा हा राष्ट्रीय सण देशाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो. त्याचा उत्सव सर्व सरकारी, खाजगी संस्था, शाळा, कार्यालये, बाजारपेठेत पाहायला मिळतो. या दिवशी सर्वजण देशभक्तीच्या वातावरणात बुडालेले दिसतात.

--By India.com News Desk
--Edited by Mohini Vaishnav
-------------------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इंडिया.कॉम)
                       -------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================