भारताचा स्वातंत्र्य दिवस-निबंध-4

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 10:58:47 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                              -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया वाचूया एक निबंध.

              स्वातंत्र्य दिवस मराठी निबंध--

     स्वातंत्र्य दिवस मराठी निबंध । Independence Day Essay--

     15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या शासनापासून मुक्त झाला. या दिवसाची आठवण म्हणून आणि स्वातंत्र्याचा वाढदिवस म्हणून आपण हा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करतो . स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण आपली अशी एक राज्य पद्धती अमलात आणली. आपले संघराज्य निर्माण झाले. त्यामध्ये लोकांनी निवडलेले लोक प्रतिनिधी कारभार करणार होते. आता कोणी राजा नाही आणि कोणी प्रजा नाही हे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी या संघराज्याची घटना लिहिली. त्याप्रमाणे आपले कायदे आपण बनवले. विविधतेत नटलेला भारत देश खूप जणांच्या बलिदानाने आज स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. आपल्याला आता कोणाचीही बंधन नाही. कोणाच्याही अधिपत्याखाली आपला भारत देश नाही. ताठ मानेने जगाचे नेतृत्व करण्यासाठी उभा आहे.

     15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन च्या पूर्वसंध्येला म्हणजे आदल्या दिवशी आपले राष्ट्रपती माध्यमातून राष्ट्राला संदेश देतात. त्यामध्ये देशात काय काय सुधारणा झाल्या आणि इथूनपुढे काय करणार आहोत, कशाप्रकारे करणार आहोत या विषयी सांगतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पंतप्रधान आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख राजघाटावर महात्मा गांधी आणि इतर थोर राष्ट्रीय नेत्यांना श्रद्धांजली वाहतात. लाल किल्ल्यावर तिरंग्याचे ध्वजारोहन होते ते देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते होते. त्यानंतर तिरंग्याला सलामी देऊन जन-गन -मन हे राष्ट्रगीत म्हणले जाते. त्यानंतर सावधान स्थितीमध्ये राहून "झेंडा उंचा रहे हमारा" हे गीत सामुदायिकपणे म्हणायचे असते. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतात. नवीन योजनांची घोषणा केली जाते. पंतप्रधान देशवासियांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देऊन भाषणाची सांगता करतात.

--चेतन  जासूड 
--------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीप्रो.कॉम)
                      ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================