भारताचा स्वातंत्र्य दिवस-स्टेटस

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 12:10:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                                -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे स्टेटस.

     15 ऑगस्टला प्रत्येकाच्या सोशल मीडियावर एक तरी स्वातंत्र्यदिन स्पेशल स्टेटस ( Independence Day Status In Marathi) असतोच. म्हणूनच खास शेअर करत आहोत स्टेटस स्वातंत्र्यदिनासाठी.

=========================================
विविधतेत एकता आहे आमची शान...म्हणूनच आहे आमचा भारत देश महान...जय हिंद, जय भारत.

सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी...ये गुलसिता हमारा...

टूथपेस्टमध्ये मीठ असो वा नसो पण रक्तात मात्र देशाचं मीठ असलंच पाहिजे.

माझी ओळख आहेस तू, जम्मूची जान आहेस तू, सीमेची आन आहेस तू, दिल्लीचं हृदय आहेस तू....हे माझ्या भारत देशा...वंदे मातरम्.

मी एक भारतीय आहे आणि हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे. वंदे मातरम्.

जगाला विचारू नका आमची काय व्यथा आहे... आमची फक्त एकच ओळख आहे...आम्ही आहोत फक्त भारतीय आणि तिच आमची खरी ओळख आहे.

ना बोलीने, ना वागण्याने, ना रंगांनी, ना ग्रीटिंगने.. तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा डायरेक्ट मनाने.

सदैव फडकत राहो तिरंगा आपुला...सर्व जगात प्रिय देश आपुला.

भारत एक सुवर्ण चिमणी आणि स्वातंत्र्य तिचे पंख आहेत.

मला नको धन मला नको तन
फक्त हवी शांतता आणि माझा वतन
जोपर्यंत जीवंत आहे देशासाठी राहीन
जेव्हा मरेन तेव्हा तिरंग्याचा कफन ओढीन
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पोहायचं असेल तर ओढ्यात काय ठेवलं आहे
प्रेम करायचं असेल तर देशावर करा इतरांमध्ये काय ठेवलं आहे
जय हिंद जय भारत

ना जगा धर्माच्या नावावर ना मरा धर्माच्या नावावर
माणुसकी हाच धर्म आहे जगा फक्त देशाच्या नावावर
संस्कार आणि संस्कृतीची भेटावी अशी
जे हिंदू-मुस्लिम एक व्हावे तसे
असेच मिळून मिसळून राहूया सदैव
देशाला बळकट करूया एकत्र राहूया
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
=========================================

--आदिती दातार
---------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================