पाऊस रात्रीची कविता-ही काळी रात्र काळरात्र ठरलीय, माझी सारी स्वप्ने विखरून गेलीय

Started by Atul Kaviraje, August 17, 2023, 11:15:04 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातील एका काळ्या रात्रीची कविता-गीत ऐकवितो. "मेघा छाए आधी रात, बैरन बन गई निंदिया"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही पावसाने विश्रांती घेतलेली, आणि थंडगार वारा वाहत असलेली रम्य गुरुवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( मेघा छाए आधी रात, बैरन बन गई निंदिया )           
-------------------------------------------------------

           "ही काळी रात्र काळरात्र ठरलीय, माझी सारी स्वप्ने विखरून गेलीय"
          ----------------------------------------------------------

ही काळी रात्र काळरात्र ठरलीय
माझी सारी स्वप्ने विखरून गेलीय
या मध्यरात्री कृष्ण ढग आलेत दाटून,
माझी झोप आज माझी वैरीण झालीय

ही काळी रात्र काळरात्र ठरलीय
माझी सारी स्वप्ने विखरून गेलीय
जIग जागून काढतेय मी ही सारी रात्र,
पियाची आठवण मला दुःखी करून गेलीय

काहीही सुचत नाहीय, ही रात्र मला जाचू लागलीय
कुणाला सांगू मी, ही अख्खी रात्र मला बोचू लागलीय
पाऊस आलाय भरून, पण तो पडत नाहीय,
पियाच्या आठवणींनी ही रात्र काही सरत नाहीय

मिटल्या पापण्यांआड त्या आठवणी फेर धरताहेत
डोळे उघडताच मला पियापासून दूर घेऊन जाताहेत
देह फक्त कूस बदलतोय, या कुशीवरून त्या कुशीवर,
नयन लागलेत झरू अवचित, अश्रू पाझरताहेत उशीवर

झोप कोसो दूर राहिलीय, पापण्या जरी मिटताहेत
फिरून पुन्हा मनाच्या कप्प्यात पियाच्या आठवणी दाटताहेत
तेव्हाच्या त्या पावसाच्या रात्रीची गोष्ट मला सांगताहेत,
मनाच्या पटलावर झुरते नयन प्रियाची चित्रे रेखाटताहेत

ही काळी रात्र काळरात्र ठरलीय
माझी सारी स्वप्ने विखरून गेलीय
आता नाही तो मजसवे, केव्हाच निघून गेलाय,
आठवतही नाही आता मजसी तो, फक्त आठवणी ठेवून गेलाय

ही काळी रात्र काळरात्र ठरलीय
माझी सारी स्वप्ने विखरून गेलीय
संसार थाटला होता त्याच्यासवे मी तेव्हा स्वप्नातदेखील,
आज ही विरहीणी पियाच्या आठवणीत विराणी गात राहिलीय

साऱ्यांचे अंगण दिव्याच्या प्रकाशात उजळून राहिलेय
माझे अंगण कृष्ण-सावट काळ्या वर्णाने झाकोळून गेलेय
त्यांचे तिथे दिवे जळताहेत, माझे इथे मन जळतंय,
पियाच्या दूर जाण्याने विरहात ते तळमळतंय, हळहळतंय 

आज ही पावसाची थंड हवाही मला थंडावा देत नाहीय
आज हा बोचरा वाराही माझ्या देहाला कसा चुभत नाहीय
काय झालय मला, काय होतंय मला, काहीच कळत नाही,
सर्व जाणीवांच्या बाहेर गेलयं मन, जणू बधिरच होई

घटI दाटून राहिलीय, कृष्ण मेघांच्या संगतीने लगटून राहिलीय
वादळाची, तुफानाची कुठेतरी जाणीव होऊन राहिलीय
ही रात्र जणू काळरात्रच आहे माझी, जीव कासावीस होतोय,
वैरीणच झालीय ही रात्र माझी, तना मनाला जIळत राहिलीय

ही काळी रात्र काळरात्र ठरलीय
माझी सारी स्वप्ने विखरून गेलीय
माझ्या स्वप्नांचा राजकुमार कुठे दूर निघून गेलाय,
त्याच्या विरहाच्या दु:खIत ही कायI चूर चूर होऊन गेलीय

ही काळी रात्र काळरात्र ठरलीय
माझी सारी स्वप्ने विखरून गेलीय
भग्न जीवन, दग्ध तन, उदास मन,
भावी जीवनाची माझ्या माती माती होऊन गेलीय

आता ही स्वप्ने का यापुढे अशीच बिखरत राहतील ?
सर्व अIशा का यापुढे निराशेतच बदलत राहतील ?
भंगलेले मन, दुभंगलेल हृदय पुन्हा कधी जुळू शकेल ?,
ही काळरात्र सरून, सकाळचा लख्ख प्रकाश माझ्या जीवनी येऊ शकेल ?

या आशेवर मी जगतेय, उद्याचे मरणही मी पाहतेय
केव्हातरी भेटेल मज माझा पिया, त्याची वाट मी अजुनी पाहतेय
वेड मन झुरतंय अजुनी, रमतंय अजुनी त्याच्या आठवणीत,
नयन पाझरायचे थांबत नाहीत, पियाच्या साठवलेल्या आठवणीत

मन उदास आहे, तृषार्त आहे, अतृप्त आहे
नयनी अश्रूंची गंगा जमून, वाहून तिला पूर येत आहे
त्यात डोळ्यातली सारी सारी स्वप्ने वाहून जात आहेत,
गाण्यातला सारा सूर, जणू  बेसूरच होऊ लागला आहे

ही काळी रात्र काळरात्र ठरलीय
माझी सारी स्वप्ने विखरून गेलीय
मनाने ठरवलंय आता यापुढे प्रेम करू नकोस,
प्रेमात पडून पुन्हा असा विरह सहू नकोस

ही काळी रात्र काळरात्र ठरलीय
माझी सारी स्वप्ने विखरून गेलीय
मी आजही त्याच्या परतण्याची वाट पाहतेय,
एक एक दिवस ढकलून, त्याच्या आठवणींवरच जगतेय

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.08.2023-गुरुवार.
=========================================