दिन-विशेष-लेख-जागतिक छायाचित्रण दिन-A

Started by Atul Kaviraje, August 19, 2023, 04:58:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                  "दिन-विशेष-लेख"
                             "जागतिक छायाचित्रण दिन"
                            -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक- 19.08.2023-शनिवार आहे.  १९ ऑगस्ट-हा दिवस "जागतिक छायाचित्रण दिन " म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     फोटोग्राफीला मोठा इतिहास आहे. ऑगस्ट महिन्यात जगभरातील छायाचित्रकार त्यांनी क्लिक केलेली उत्कृष्ट छायाचित्रे विविध मंचांवर शेअर करतात आणि 19 ऑगस्ट रोजी छायाचित्रकारांना सन्मानित करण्यासाठी जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला जातो.

  जागतिक छायाचित्रण दिन : काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमही बदलली--

     आज जागतिक छायाचित्रण दिन...दहा-पंधरा वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल... टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले. तथापि, या कलेतली रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची एक्साइटमेंट आजही तशीच आहे. १९ ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो. कारण, या दिवशी सन १८३९ साली फ्रेंच सरकारने फोटोग्राफीचे पेटेंट विकत घेऊन जगाला मुक्त केले. काही वस्तू प्रकाश आणि अंधाराचा खेळ यामुळे बदलतात. या साध्या तत्त्वातून साधारण सन १८०० मध्ये कॅमेरा ही कल्पना विचारात आली. १८३९ च्या दरम्यान व्यावसायिक छायाचित्रकलेचा जन्म झाला. जोसेफ निकफेर निएपेस यांनी सर्वात पहिला फोटो काढल्याचे सांगितले जात आहे. जोसेफ यांनी १९२६ ते १९२७ दरम्यान फ्रान्सच्या बरगंडी प्रदेशातील 'द ग्रास' येथील एका खिडकीतून दिसणाऱ्या दृश्याचे पहिले छायाचित्र टिपले होते.

     कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक क्षेत्रांची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली. देशातील अनेक उद्योगधंदे बंद पडले, त्यामुळे काहींच्या नोक-या गेल्या तर काहींना निम्या पगारावरती काम करावं लागलं. कोरोनाचा छायाचित्रकरांनाही मोठा फटका बसला असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना विषाणूने साधारण मार्चपासून देशात थैमान घालायला सुरुवात केली. यात अनेक व्यावसायिक क्षेत्रं मेटाकुटीला आली, त्यामुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला. आज छायाचित्रकारांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. या कोरोनामुळे फोटोग्राफीचा धंदा पाण्यात गेला असून लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम, वाढदिवस यासारख्या कार्यक्रमांवर सरकारने निर्बंध लादल्यामुळे फोटोग्राफीला उतरती कळा आली आहे. 

     जगभरातल्या छायाचित्रकारांनी १९ ऑगस्ट २०१० साली पहिल्या जागतिक दिनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात जगभरातून अनेक छायाचित्रकारांनी भाग घेतला होता. याच चित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांना १०० हून अधिक देशांनी पहिले. त्यामुळे १९ ऑगस्ट हा दिन जागतिक छायाचित्र दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॅमेरा १९९० मध्ये जन्माला आला. त्यानंतर सातत्याने डिजिटल कॅमेऱ्यामध्ये बदल होत गेले, उत्क्रांती होत गेली. सध्या छायाचित्रण व्यवसाय नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे. त्यानिमित्ताने अनेक हौशी फोटोग्राफर आपल्याला पाहायला मिळतात. हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा करतात ज्यांनी आपले अनमोल क्षण छायाचित्राच्या रुपात कैद केले व त्यांना नेहमीसाठी स्मरणात ठेवले.

--By-Balkrishna Madhale
----------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ- इ सकाळ.कॉम)
                     -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.08.2023-शनिवार.
=========================================