दिन-विशेष-लेख-जागतिक छायाचित्रण दिन-B

Started by Atul Kaviraje, August 19, 2023, 04:59:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                              "जागतिक छायाचित्रण दिन"
                             -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक- 19.08.2023-शनिवार आहे.  १९ ऑगस्ट-हा दिवस "जागतिक छायाचित्रण दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     प्रकृतीने प्रत्येक प्राणीमात्राला जन्मत: एक कॅमेरा दिला आहे, ज्यामुळे ते प्रत्येक वस्तूच्या छबीला आपल्या डोक्यात अंकित करू शकते आणि तो कॅमेरा म्हणजे आपले डोळे. तसं पाहिलं तर प्रत्येक प्राणी एक फोटोग्राफर आहे. वैज्ञानिक दृष्टीने माणसाने आपले साधन वाढविण्यास सुरुवात केली आणि अनेक आविष्कारांसोबत कृत्रिम लेन्सचा पण अविष्कार झाला. वेळे सोबत समोर चालतांना या लेन्सच्या छायाचित्रांना स्थाई रुपात समोर आणले. याच प्रवासाच्या यशाला आपण फोटोग्राफी डेच्या रुपात साजरा करतो. हजार शब्दांत जे सांगता येत नाही, त्यापेक्षा अधिक आशय एक समर्पक छायाचित्र सांगू शकते, असे आपल्या काही वेळेस निदर्शनास आले असेल. गणेशोत्सव अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपला असून त्यातच सततच्या पावसामुळे निसर्ग सौंदर्यालाही बहर आला आहे. मात्र, हे सगळं चित्र कॅमे-यात टिपण्यासाठी कोरोनामुळे घराबाहेर पडणे मुश्किल बनले आहे. या महामारीमुळे गणेशोत्सव, दसरा, दिवाळी सणांवरही मोठे संकट ओढावल्याने फोटोग्राफी व्यवसायालाही याचा फटकाच बसणार आहे. सध्या प्रत्येकाकडे मोबाइल फोन आल्याने फोटोग्राफी व्यवसायाला उतरती कळा आली आहे. महागड्या मोबाइलमध्ये कॅमे-याच्या सर्व सुविधा उपलब्ध असल्याने फोटोग्राफी व्यवसायाला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सध्याच्या फोरजी जमान्यात जुन्या कॅमेरा फोटोग्राफीला अल्पच प्रतिसाद मिळत आहे. त्यात ह्या कोरोनाचे संकट! यामुळे हा फोटोग्राफी व्यवसाय बंद करण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

     आज कॅमेरा खरेदी करतानाही अनेक हौशी कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे, त्याचा मेगाफिक्सल किती सिमॉस किंवा सीसीडी (कॅमेराचा सेंसर) त्याचा साईज किती आहे. बॅटरी कोणत्या प्रकारची व किती कपॅसिटी आहे, त्याची आवर्जुन चौकशी करतात, ते योग्यही आहे. सध्या फोटोग्राफी व्यवसायामध्ये फोटोग्राफरना कॅमेरा घेताना फार दक्षता घेतली पाहिजे. कारण आपण कोणत्या प्रकारचे काम करतो, आपल्याला फोटो सर्वात मोठा किती साईजमध्ये करावयाला लागतो, आपण कोणत्या ठिकाणी काम करतो त्याचबरोबर आपल्याला अंदाजे झूम किंवा वाईड लेन्सची गरज किती आहे, हे पाहणे गरजेचे आहे. शिवाय कॅमेरामध्ये ऑडीओ, व्हिडीओची सोय आहे काय, फोकसिंग पॉईंट किती आहे व त्यामध्ये कशा स्वरुपात आपण बदल करू शकतो, याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. कॅमेरा घेतल्यानंतर त्या कॅमेऱ्याबरोबर आलेले कॅटलॉग महत्त्वपूर्ण ठरतात. फोटोग्राफीची भाषा. उदा. अॅपारचर, शटरस्पिड, खडज, व्हाईट बॅलन्स, लार्ज, मेडियम, स्मॉल, फाईन, मेडीयम, बेसिक अशा पद्धतीने चित्रमय माहिती असते. मात्र, सद्यस्थितीत फोटोग्राफी व्यवसायाला कोरोना महामारीचा चांगलाच फटका बसला असून अनेकांचे व्यवसायही बंद पडले आहेत.

--By-Balkrishna Madhale
----------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ- इ सकाळ.कॉम)
                       ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.08.2023-शनिवार.
=========================================