२१-ऑगस्ट-दिनविशेष-B

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:18:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                "२१-ऑगस्ट-दिनविशेष"
                               ----------------------

-: दिनविशेष :-
२१ ऑगस्ट
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००६
बिस्मिला खाँ – शहनाई नवाझ
(जन्म: २१ मार्च १९१६)
२००१
शरद तळवलकर
शरद तळवलकर – आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार
(जन्म: १ नोव्हेंबर १९२१)
२००१
मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले शं. ना. तथा दादासाहेब अंधृटकर
(जन्म: ? ? ????)
२०००
विनायकराव कुलकर्णी – स्वातंत्र्यलढ्यातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत
(जन्म: ? ? ????)
२०००
निर्मला गांधी – समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्‍नुषा, गांधीजींचा तिसरा मुलगा रामदास गांधी यांच्या पत्नी
(जन्म: ? ? ????)
१९९५
सुब्रमण्यम चंद्रशेखर
सुब्रमण्यम चंद्रशेखर – तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय-अमेरिकन खगोल वैज्ञानिक व गणिती. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ कृष्णविवरांवरील (Black Holes) संशोधनासाठी खर्च केला. यांचे काका सी. व्ही. रामन यांनाही भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९३०) मिळाले आहे. भौतिकशास्त्रात नोबेल मिळवणारे हे दोघेच भारतीय वंशाचे आहेत.
(जन्म: १९ आक्टोबर १९१०)
१९९१
गोपीनाथ मोहंती – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक
(जन्म: २० एप्रिल १९१४)
१९८१
आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा 'काकासाहेब' कालेलकर – गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार, बहुभाषा कोविद, रसिक, सखोल चिंतक, गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरू (१९२८), राज्यसभा सदस्य (१९५२ - १९५८), अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष (१९५३), गुजराथी साहित्यपरिषदेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष (१९५९), हिन्दी विश्वकोश निर्मिती समितीचे सदस्य, साहित्य अकादमी पारितोषिक (१९६६) व फेलोशिप (१९७१) विजेते, पत्रकार व गुजराथी साहित्यिक
(जन्म: १ डिसेंबर १८८५ - सातारा, महाराष्ट्र)
१९७८
विनू मांकड
विनू मांकड – पहिल्या क्रमांकापासून ते अकराव्या क्रमांकापर्यंत सर्व क्रमांकांवर फलंदाजी करण्याचा विक्रम. अशी कामगिरी करणारे फक्त तीनच खेळाडू आहेत. सर्वात कमी कसोटी (२३) सामन्यांमध्ये १००० धावा व १०० बळी घेण्याचा विक्रम. हा विक्रम बरीच वर्षे अबाधित होता. पुढे इंग्लंडच्या इयान बोथम यांनी २१ कसोटी सामन्यात ही कामगिरी करून तो विक्रम मोडला. एका कसोटी सामन्यात १० बळी घेणारे पहिले भारतीय गोलंदाज. १९५६ मध्ये पंकज रॉय बरोबार न्यूझीलंड विरुद्ध खेळताना त्यांनी पहिल्या विकेटसाठी ४१३ धावांची भागीदारी केली. हा विक्रम ५२ वर्षे अबाधित होता. नॉन स्ट्रायकर एन्डला असणारा ऑस्ट्रेलियाचा बिल ब्राऊन हा सारखा क्रीजच्या बाहेर जात असल्यामुळे मांकड यांनी त्याला धावबाद केले. बाद करण्यापूर्वी मांकड यांनी त्याला दोनदा ताकीद दिली होती. या नियमाला पुढे Mankading असे नाव पडले. १९४७ चे विस्डेन क्रिकेटर ऑफ द ईयर.
(जन्म: १२ एप्रिल १९१७)
१९७७
प्रेमलीला ठाकरसी – एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू
१९७६
पांडुरंग सातू नाईक– आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक (Cinematographer), 'हंस पिक्चर्स' चे एक भागीदार. 'छाया', 'धर्मवीर', 'प्रेमवीर' (१९३७), 'ज्वाला' (१९३८), 'ब्रह्मचारी', 'ब्रँडीची बाटली' (१९३९), 'देवता', 'सुखाचा शोध' (१९३९), 'लग्न पहावं करुन' (१९४०), 'अर्धांगी' (१९४०), 'पहिला पाळणा', 'भक्त दामाजी' (१९४२), 'पैसा बोलतो आहे' (१९४३), 'रामशास्त्री' (१९४४), 'लाखारानी' (१९४५), 'चिराग कहाँ रोशनी कहाँ' इत्यादी अनेक चित्रपटांचे उत्कष्ट छायालेखन त्यांनी केले.
(जन्म: १३ डिसेंबर १८९९)
१९४०
लिऑन ट्रॉट्स्की – रशियन क्रांतिकारक
(जन्म: ७ नोव्हेंबर १८७९)
१९३१
'गायनाचार्य' पं. विष्णू दिगंबर पलुसकर – संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक
(जन्म: १८ ऑगस्ट १८७२)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================