नागपंचमी-लेख-6

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:28:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "नागपंचमी"
                                     ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपंचंमीवर महत्त्वाचा लेख. 

          प्रस्तावना (INTRODUCTION OF NAGPANCHAMI 2023):-

     NAG PANCHAMI FESTIVAL INFORMATION IN MARATHI : नाग पंचमी संपूर्ण माहिती मराठी :– श्रावण महिना आला की सणांना सुरुवात होते. भारतामध्ये अनेक जाती, धर्माचे लोक हे सगळे सण आनंदाने आणि मोठ्या उत्साहात साजरे करतात. या श्रावण महिन्याला सणांचा महिना म्हणून ओळखले जाते. याच श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमी संपूर्ण भारतभर साजरी केली जाते. या सणाचा इतिहास, याचे महत्त्व नक्की काय आहे? हे आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. चला तर मग, पाहूया नागपंचमी सण संपूर्ण माहिती मराठी

            नागपंचमीचा इतिहास (HISTORY OF NAGPANCHAMI):-

     भारतामध्ये श्रावण महिना सुरू झाला की, श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी म्हणजेच श्रावण शुद्ध पंचमीला हा नागपंचमीचा सण साजरा केला जातो. पौराणिक आख्यायिकेनुसार असे म्हटले जाते की, जनमेजय राजा सर्पयज्ञ करत होता. त्यावेळी आस्तिक नावाच्या ऋषींनी त्याला प्रसन्न करून घेतले. त्यानंतर जनमेजयने आस्तिक ऋषींना वर मागण्यासाठी सांगितल्यावर आस्तिक ऋषींनी त्यांना सर्पयज्ञ थांबवण्याचा वर मागून घेतला. त्यामुळे जनमेजयला सर्पयज्ञ थांबवावा लागला. तो दिवस श्रावण पंचमीचा होता.

     कृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले होते. तो दिवस देखील श्रावण शुक्ल पंचमीचा होता. वृंदावनातील लोकांना या नागापासून कृष्णाने वाचवले. म्हणूनच वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो.

     काही युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक देवी होती. तिच्या भावाचे नाव सत्येश्वर असे होते. या पंचमीच्या आदल्या दिवशी सत्येश्वराचा मृत्यू झाला होता. त्या नंतर सत्येश्वर हा तिचा भाऊ सत्येश्वरीला नागरूपात दिसला. त्या नागरूपाला तिने आपला भाऊ मानले. या नागरूपातल्या सत्येश्वराने तिला वचन दिले की, जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल, तिचे मी सदैव रक्षण करेन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून हा सण साजरा केला जातो.

           नागपंचमी अर्थ – (MEANING OF NAGPANCHAMI):-

     भगवान शंकरांचे निराकारी प्रतिकात्मक रूप म्हणून नागाला महत्त्व आहे. या नागदेवाच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे हिंदू महिन्याच्या म्हणजेच श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. म्हणूनच या सणाला "नागपंचमी" असे म्हटले जाते.

--by Team Marathi Zatka
----------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================