नागपंचमी-लेख-8

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:31:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "नागपंचमी"
                                     ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपंचंमीवर महत्त्वाचा लेख. 

            भारतातील नागपंचमी -(NAGPANCHAMI FESTIVAL 2023)--

     नागपंचमी सण :- नाग देवाला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण भारतातील लोक नागदेवाची पूजा करतात. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये नागपंचमी कशाप्रकारे साजरी केली जाते याची माहिती खालील प्रमाणे –

१. उत्तर भारत –
शारीरिक शक्तीचे प्रदर्शन आणि शारीरिक सामर्थ्य वाढवणे या दृष्टीने या दिवसाला उत्तर भारतामध्ये महत्त्व आहे. कुस्तीपटू कुस्तीचे सादरीकरण या दिवशी आखाड्यामध्ये करतात. या दिवशी कुस्तीची लढत ही पारंपारिक लढती सारखी होत नसून भगवान शंकर, श्रीराम तसेच हनुमान आणि आखाड्याची भूमी यांना अभिवादन करून केली जाते.

२. राजस्थान –
एका पौराणिक आख्यायिकेनुसार नागिनी ने दिलेल्या मण्यामुळे एका सुनेचा घरामध्ये सन्मान झाला होता. त्यामुळे त्या ठिकाणच्या प्रत्येक घरातील सुना ह्या मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा नागपंचमीचा सण साजरा करतात.

३. दक्षिण भारत –
या ठिकाणी गाईच्या शेणापासून नागाची प्रतिमा तयार केली जाते आणि तिची पूजा केली जाते. या प्रतिमेवर चंदन, हळद यापासून पाच फण्यांचा नाग तयार करून त्याची पूजा करण्याची देखील या ठिकाणी प्रथा आहे.

४. कच्छ प्रदेशातील भूजगाव –
या ठिकाणच्या नागा जमातीतील सदस्यांना नागपंचमीच्या मिरवणुकीमध्ये महत्त्वाचा मान दिला जातो. घोडे, हत्ती यांना सजवून मिरवणूक काढली जाते. स्त्री – पुरुष त्यांच्या पारंपारिक पोशाखामध्ये या मिरवणुकीमध्ये उत्साहाने सामील होतात. या मिरवणुकीसाठी नागांच्या मूळ जमातीचे सदस्य नेपाळ देशातून आवर्जून आमंत्रित केले जातात.

५. पंजाब –
या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी घरोघरी भिंतींवर नागाची काळया रंगाची प्रतिकृती काढली जाते. आणि त्याची पूजा केली जाते. अशी पूजा केल्याने वर्षभर सापाचे दर्शन होत नाही असा त्या लोकांचा समज आहे.

६. आदिवासी समाज –
या दिवशी या ठिकाणचे लोक एका मोठ्या झाडाची फांदी तोडून ती उलटी म्हणजेच निमूळती बाजू जमिनीत पुरतात. आणि फांदीचा मोठा भाग हा व्यवस्थित तासून घेतात. असे केल्यामुळे त्यावर्षी शेतामध्ये भरपूर पीक येते असे या ठिकाणच्या लोकांचा समज आहे.

७. नाथ संप्रदाय –
नागपंचमीच्या दिवशी दर बारा वर्षांनी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा – गौतमी च्या संगमावर स्नान करतात.

८. इतर राज्ये –
उत्तर प्रदेश, गुजरात, काश्मीर, मध्य प्रदेश, बंगाल यासारख्या राज्यांमध्ये या दिवशी नागांची पूजा केली जाते.

९. कश्मीर –
या ठिकाणी संतनाथ, इंद्रनाथ, शेषनाग यासारखी देवळे असून चिनाब नदीच्या काठी वासूकीचे मंदिर देखील आहे. त्यामुळे या ठिकाणी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

       नागपंचमी शुभमुहूर्त २०२३ – (NAGPANCHAMI MUHURAT 2023)--

            नागपंचमी सण मुहूर्त :-

     ऑगस्ट महिन्यामध्ये साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार यावर्षी अधिक महिना आलेला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये येणारी ही नागपंचमी कधी आहे? आणि या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे? हे जाणून घेऊया.

तारीख – २१ ऑगस्ट २०२३
मुहूर्त – सकाळी ०६.२१ ते ०८.५३ पर्यंत
राहुकाल – सकाळी ०७.५६ ते ०९.३१ पर्यंत ( या काळात पूजा करू नये.)
इतर मुहूर्त –
ब्रह्म मुहूर्त – पहाटे ०४.५१ ते ०५.३६ पर्यंत
अभिजीत मुहूर्त – दुपारी १२.१६ ते ०१.०७ पर्यंत
विजय मुहूर्त – दुपारी ०२.४८ ते ०३.३९ पर्यंत
संधिप्रकाश मुहूर्त – संध्याकाळी ०७.०२ ते ०७.२५ पर्यंत
अमृत काळ – संपूर्ण दिवस

                नागपंचमी सण संपूर्ण माहिती :-

      पौराणिक आख्यायिकेनुसार या दिवशी कोणत्याही प्राण्यांचे संरक्षण व्हावे त्यांच्या जीवाला इजा होऊ नये अशी सुद्धा परंपरा आहे. यातून एक वैज्ञानिक दृष्टिकोनच आपल्याला दिसून येतो. या दिवशी या सणाच्या निमित्ताने विज्ञान विषयक आस्था असणाऱ्या विज्ञान प्रेमींनी समाजातील लोकांचे सापांविषयीचे समज, गैरसमज तसेच अज्ञान दूर केले पाहिजे. सापांच्या विविध प्रजातींचे ज्ञान होण्यासाठी या ठिकाणी प्रदर्शन आणि व्याख्यान आयोजित करता येईल याकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे सापांवर आधारित विविध प्रकारची डॉक्युमेंटरी, व्हिडिओ सुद्धा समाजातील लोकांना दाखवून त्यांचे अज्ञान दूर करता येईल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.

--by Team Marathi Zatka
----------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================