नागपंचमी-लेख-9-B

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:35:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "नागपंचमी"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपंचंमीवर महत्त्वाचा लेख. 

              नागपंचमी आणि स्त्रियांची श्रद्धा –

या सणाच्या दिवशी विवाहित बहिणीला तिचा भाऊ तिला माहेरी घेऊन जातो अशी भारतामध्ये प्रथम रूढ झालेली आहे.
आपल्या भावाला चांगले आयुष्य आणि आरोग्य मिळावे तसेच सुख शांती मिळावी यासाठी बहिणी नागाची पूजा करतात.
सत्येश्वरी देवीच्या भावाच्या मृत्यूमुळे या देवीने त्या दिवशी अन्नग्रहण केले नाही नंतर तिचा भाऊ नागरूपात येऊन त्यांनी असे वचन दिले तिची बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल त्याचे रक्षण करेल. म्हणून या दिवशी बहिणी आपल्या भावासाठी उपवास करतात.
या दिवशी स्त्रिया गोलाकार आकार तयार करून झिम्मा, फुगडी सारखी नृत्य आणि खेळ खेळतात फेर धरून नाचतात.
पूजेला जाण्याआधी काही ठिकाणी स्त्रियांची हाताला मेहंदी लावण्याची देखील पद्धत रूढ झालेली आहे.
या दिवशी मुली, स्त्रिया झाडाला झोके बांधून झोके घेत असतात. आणि नागाची भाऊ म्हणून गाणी म्हणत असतात.
नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा का करावी?
असे समजले जाते की, नाग भयंकर असा प्राणी आहे. पाहताक्षणी तो मनुष्याला दंश करतो. परंतु हा समज खरा नाही. सापाच्या खूप कमी जाती विषारी असतात आणि हा त्याचवेळी आपल्याला दंश करतो ज्यावेळी आपल्याकडून त्याला धोका निर्माण होतो. तो आपल्याला दंश करू नये म्हणून त्या आधीच आपल्या मनामध्ये त्याला मारण्याची भावना निर्माण होते. त्यामुळे या पूजेद्वारे आपल्या मनातील भीती आणि वाईट भावना दूर करण्यासाठी या दिवशी त्याची पूजा केली जाते. त्याच्यावर अभिषेक करून त्याला सुगंधी फुले, त्याचप्रमाणे लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच या दिवशी गाणी वगैरे म्हणून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

               नागपंचमी कशी साजरी करतात?

     नागपंचमी माहिती :- या दिवशी सर्वजण सकाळी लवकर उठतात. संपूर्ण घर, आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून नवीन कपडे परिधान केले जातात. आणि देवाची यथावकाश अभिषेक आणि पूजा केली जाते. त्यानंतर आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही वारुळाची पूजा केली जाते. या दिवशी घरामध्ये नागाची चित्रे काढली जातात. शहरी भागांमध्ये पाटावर नागाची मातीची मूर्ती आणून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर देवा पुढे ठेवलेला प्रसाद हा सगळ्यांना वाटला जातो. ग्रामीण भागातील लोक या दिवशी झाडाला झोके बांधून झोके घेतात. त्याचप्रमाणे पूजा करण्याआधी स्त्रिया हाताला मेहंदी लावतात. या दिवशी फुगड्या,नाच यांचा फेर धरून गाणी म्हणून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. काही ठिकाणी या दिवशी मोठ्या जत्रा देखील भरल्या जातात.

--by Team Marathi Zatka
----------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================