नागपंचमी-लेख-11

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:38:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "नागपंचमी"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपंचंमीवर महत्त्वाचा लेख. 

             नागपंचमी कथा –

     एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्याच्या शेतामध्ये एक वारूळ होते. तो श्रावण महिन्यातील नागपंचमीचा दिवस होता. शेतकरी आपल्या नित्यनेमाप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. आणि शेत नांगरू लागला. त्या ठिकाणी असलेल्या वारुळाला नांगराचा फाळ लागून त्या वारुळात असलेल्या नागाची पिल्ले मरण पावली.

     थोड्या वेळानंतर नागिण त्या ठिकाणी आल्यावर आपले वारूळ पाहू लागले तर त्या ठिकाणी तिला वारूळ आणि पिल्ले दिसली नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला. तिच्या मनात आले की, ह्या शेतकऱ्याने त्याच्या नांगराने माझी पिल्ले आणि वारूळ दोन्हीही उध्वस्त केले. रागाने ती त्या शेतकऱ्याच्या घरात गेली आणि घरात असलेल्या सगळ्यांना दंश करून तिने मारून टाकले नंतर तिला समजले की, शेतकऱ्याची एक मुलगी लग्न होऊन दुसऱ्या गावी राहत आहे.

     नागाने तिच्या गावी जाऊन तिला देखील मारण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्यावेळी नाग तिच्यापर्यंत पोहोचला त्यावेळी ती शेतकऱ्याची मुलगी नागाची पूजा करत होती. त्यानंतर तिने दुधाचा नैवेद्य दाखवून लाह्या, दुर्वा, फुले वाहिली. यामुळे तिची ही पूजा आणि श्रद्धा पाहून नाग खुश झाले. त्यानंतर त्या मुलीवर ते प्रसन्न होऊन आई-वडिलांबाबत विचारणा करू लागले. त्यावेळी तिला समजले की, आपण ज्या कुटुंबाला दंश करून मारले हेच तिचे कुटुंब.

     झालेला सगळा प्रकार नागाने त्या मुलीला सांगितला. त्यामुळे मुलीला फार वाईट वाटले व तिने या सगळ्यांना कसे जिवंत करावे याविषयीची माहिती विचारली. त्यानंतर नागाने तिला अमृत आणून दिले. मुलगी अमृत घेऊन आपल्या माहेरी गेली. आणि सर्वांच्या तोंडात तिने अमृत घातले. त्यामुळे सगळी मंडळी, सगळे कुटुंब जिवंत झाले. आणि सगळ्यांना आनंद झाला.

     पुढे घडलेला सगळ्या प्रकार तिने आपल्या आई-वडिलांना सांगितला आणि हे व्रत कसे करावे? याचा सगळा पूजेचा विधी सांगितला. त्यानंतर या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर काही शिजवू नये, तळलेले खाऊ नये असे देखील सांगितले. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. या कुटुंबाला जसा नाग प्रसन्न झाला, तसाच आपल्याला देखील नाग प्रसन्न व्हावा अशी इच्छा व्यक्त करूया.

               प्रश्न –

--१. नागपंचमी कधी असते?

--हिंदू पंचांगानुसार मराठी श्रावण महिन्यामध्ये पाचव्या दिवशी नागपंचमी असते.

--२. नागपंचमीला कोणाला पुजले जाते?

--नागपंचमीला नागाला पुजले जाते.

--३. नागपंचमीच्या दिवशी काय करू नये?

--नागपंचमीच्या दिवशी शेतातील कामे, त्याचप्रमाणे खणू नये, तोडू नये, चिरु नये, कापू नये तसेच धारदार वस्तूंचा वापर करू नये, जेवणामध्ये काही तळू नये, लोखंडी तव्यावर काहीही करू नये.

--४. नागाला दूध पाजावे का?

--नागाला दूध पाजणे हे आपल्या श्रद्धेचे एक प्रतीक मानले जाते. परंतु नाग हा मांसाहारी प्राणी असल्यामुळे तो बेडूक, उंदीर यासारखे प्राणी खातो. दूध पिल्यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो.

--५. नागांचे आयुष्य किती वर्षांचे असते?

--नागांचे आयुष्य हे साधारण दहा ते पंचवीस वर्षांच्या दरम्यान असते.

--६. सन २०२३ ला नागपंचमी कधी आहे?

--सन २०२३ ला नागपंचमी २१ ऑगस्ट २०२३ सोमवारी आहे.

--by Team Marathi Zatka
----------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================