नागपंचमी-शुभेच्छा संदेश-1

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:44:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "नागपंचमी"
                                       ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपंचंमीवर शुभेच्छा संदेश. 

     श्रावण महिन्याला सणांचा महिना असे म्हणतात या महिन्यात येणारा पहिला अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी श्रावण महिन्याच्या नागपंचमीला पंचमी असेही म्हणतात. नाग या प्राण्याबद्दल भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी नागदेवता ची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे.नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया भावासाठी उपवास करतात भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून वाचवला जावो हे उपवास करण्यामागे एक कारण आहे.

=========================================
कोकिळा गाई मंजुळ गाणी,

नागपंचमीच्या शुभदिनी,

सुख समृद्धी नांदो जीवनी...

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!


मान ठेवूया नाग राजाचा,

पूजा करुन शिवशंकर भोले देवाचा

रक्षण करूया नागाचे,

जतन करूया अपल्या निसर्गाचे

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


नागपंचमी!

श्रावण महिन्यातील पहिला

महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी..

कालिया नागाचा पराभव करून,

यमुना नदीच्या पात्रातून,

भगवान श्रीकृष्ण

सुरक्षित वर आले..

तो दिवस म्हणजे,

श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी...

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!


भगवान शिव शंकरच्या गळ्यात सापांचा हार आहे.

नाग पंचमी हा महादेवाच्या भक्तांसाठी खास उत्सव आहे.

🎕🎕नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎕🎕


वारुळाला जाऊया,

नागोबाला पुजूया...

🌺नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा!🌺


हा दिवस आपल्यासाठी नशीब, यश आणि धैर्य आणून देईल.

शिवाला प्रार्थना करा आणि तुम्हाला सुख अधिक मिळेल!

🌺नाग पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌺


देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे.

🌺नाग पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌺
=========================================

--अनिकेत
----------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी चारोळी.इन)
                       -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================